एक्स्प्लोर

OTT Release In September 2024 : 'कॉल मी बेब' ते 'सेक्टर 36'; ओटीटीवर 'या' महिन्यात 12 चित्रपट, वेब सीरिज होणार रिलीज

OTT Release In September 2024 : सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना वेब सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. वेगवेगळ्या धाटणीचे डझनभर चित्रपट, वेब सीरिज या महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

OTT Release In September 2024 : सध्या अनेकजण मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. ओटीटी प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. वेब सीरिजसोबतच  काही चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होत असतात. सप्टेंबर महिना सुरू झाला असून या महिन्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना वेब सीरिज आणि चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. वेगवेगळ्या धाटणीचे डझनभर चित्रपट, वेब सीरिज या महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार आहेत. 

>> सप्टेंबर 2024 मध्ये ओटीटीवर काय रिलीज होणार?

- एमिली इन पॅरिस सीझन 4 पार्ट (Emily In Paris S4 Part 2)

एमिली तुम्हाला तिच्या फॅशनने भरलेल्या जगात घेऊन जाण्यास उत्सुक आहे. या शोच्या चौथ्या सीझनचा दुसरा भाग रिलीज होणार आहे.

रिलीज डेट -12 सप्टेंबर 2024 

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्सवर पाहता येईल

- थलावन (Thalavan)

उलटसुलट घडामोडी घडत असलेल्या राजकारणातील धाडसाची एक जबरदस्त रंजक गोष्ट पाहता येणार आहे. तुम्हाला असे चित्रपट किंवा वेब शो पाहण्याची आवड असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. 

रिलीट डेट- 10 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? सोनी लिव्ह या ओटीटीवर पाहता येईल

- कॉल मी बे (Call Me Bae)

ही एक रोमँटिक कॉमेडी वेब सीरिज आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे झळकणार आहे. कथा आधुनिक काळातील आहे. यामध्ये नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे.  या वेब सीरिजमध्ये अनन्या पांडेसह वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान सामत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथुर यांच्या भूमिका आहेत. 

रिलीट डेट- 6 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर पाहता येईल

- सेक्टर 36 (Sector 36)

हा क्राईम-थ्रिलरपट आहे. याची कथा ही दिल्लीतील सत्य घटनेवर आधारीत आहे. मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या सीरियल किलर करतो. या चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत,  दीपक डोबरियाल आणि आकाश खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत  या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकरने याने केले आहे. 

रिलीट डेट- 13 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल. 

रिबेल रिज (Rebel Ridge)

भ्रष्टाचाराच्या दलदलीत बुडालेल्या शहरात एक तरुण आपल्या भावाच्या जामिनासाठी पोलीस यंत्रणेसोबत संघर्ष करतो. त्याने हा संघर्ष सुरू केला नसला तरी त्याचा शेवट तोच करतो. 

रिलीट डेट- 13 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल. 

तणाव सीजन 2 (Tanaav S2)

'तणाव' या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता याच सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तणाव' ही वेब सीरिज एका स्पेशल टास्क ग्रुपची गोष्ट आहे. दहशतवादाच्या विरोधात त्यांनी केलेल्या कारवाईचे चित्रण यात आहे.  'फौदा' या गाजलेल्या वेब सीरिजचे हे भारतीय रुपांतरण आहे. 

रिलीट डेट- 6 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? सोनी लिव्ह या ओटीटीवर पाहता येईल. 

द परफेक्ट कपल (The Perfect Couple)

'द परफेक्ट कपल' ही निकोल किडमन, लिव्ह श्रेबर, डकोटा फॅनिंग आणि इव्ह ह्यूसन यांची भूमिका असलेली एक आगामी अमेरिकन सस्पेन्स ड्रामा सीरिज आहे. एलिन हिल्डरब्रँडच्या त्याच नावाच्या 2018 च्या कादंबरीचे रूपांतर आहे. 

रिलीट डेट- 5 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल. 

ऑफिसर ब्लॅक बेल्ट (Officer Black Belt)

ऑफिसर ब्लॅक बेल्ट ही कोरियन वेब सीरिज  आहे. ऑफिसर ब्लॅक बेल्टमध्ये, ब्लॅक नाइट स्टार किम वू बिन आणि डीपी स्टार किम सुंग क्यून मार्शल आर्ट्स मास्टर आणि मास्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

रिलीट डेट- 13 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल. 

अगाथा ऑल अलॉन्ग (Agatha All Along)

फँटन्सीपटाची तुम्हाला आवड असेल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. सत्ता, धोका आणि सूड या भोवती ही गोष्ट आहे. यामध्ये कॅथरीन हॉनची भूमिका आहे. 

रिलीट डेट- 18 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटीवर पाहता येईल. 

ट्वाइलाइट ऑफ़ द गॉड्स (Twilight Of The Gods)

 या अॅनिमेटेड सीरिजमध्ये पौराणिक कथांची झलक आहे. अॅनिमेशनमध्ये अॅक्शनपट पाहता येईल. 

रिलीट डेट- 19 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? नेटफ्लिक्स या ओटीटीवर पाहता येईल. 

फॉल गाय (Fall Guy)

हेरगिरी आणि फसवणुकीच्या जगात एक रोमांचक प्रवास यात आहे. यात तुम्हाला जबरदस्त ॲक्शन देखील पाहायला मिळेल.

रिलीट डेट- 3 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? जियो सिनेमा या ओटीटीवर पाहता येईल. 

मॉन्स्टर्स (Monsters)

ही एका कुटुंबाची गोष्ट आहे. जगासमोर हे अतिशय सुंदर कुटुंब आहे. पण त्यामागे भयावह रहस्ये दडलेली आहेत.  

रिलीट डेट- 3 सप्टेंबर 2024

कुठे पाहता येणार? जियो सिनेमा या ओटीटीवर पाहता येईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget