Oscars 2024 Robert Downey Jr : 'आर्यनमॅन' रॉबर्ट डाउनीला मिळाला कारकिर्दीतील पहिला ऑस्कर, दिली भावूक प्रतिक्रिया
Oscars 2024 Robert Downey Jr : आर्यनमॅन रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर याला आपल्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे,
Oscars 2024 Robert Downey Jr : अॅव्हेंजर सीरिजमधील आर्यनमॅन रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर (Robert Downey Jr) याला आपल्या रुपेरी पडद्यावरील कारकिर्दीतील पहिला ऑस्कर पुरस्कार (Oscars 2024 ) मिळाला आहे. 'ओपनहायमर' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरला आतापर्यंत तीन वेळेस ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. मात्र, यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रॉबर्टला काळी बाहुली उंचावण्याची संधी मिळाली.
Congratulations to Robert Downey Jr. on winning Best Supporting Actor for 'Oppenheimer'! #Oscars pic.twitter.com/fFrgo9SiEn
— The Academy (@TheAcademy) March 11, 2024
रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरची भावूक प्रतिक्रिया
रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरने ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या खास अंदाजात प्रतिक्रिया दिली. त्याने आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली. रॉबर्ट डाउनी ज्यूनिअर म्हटले की, मला कामाची खूपच गरज होती. काम मिळवण्यासाठी मी धडपड करत होतो. त्याच वेळी मला ख्रिस्तोफर नोलन याने या चित्रपटासाठी मला विचारणा केली. या पुरस्कारासाठी रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरने दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन आणि चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. कठीण काळात साथ दिल्याबद्दल रॉबर्टने आपल्या पत्नीचेही आभार मानले.
OSCAR WINNER ROBERT DOWNEY JR!! #Oscars #Oscars2024 pic.twitter.com/gsbCvsICAH
— Kaoru (@rdjxduckling) March 11, 2024
आतापर्यंत कोणाला मिळाला प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार
ओपनहायमर, ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांची यंदाच्या सोहळ्यात चर्चा आहे. दा’वाइन जॉय रँडॉल्फने ‘द होल्डओव्हर’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार ‘वॉर इज ओव्हर’ या शॉर्ट फिल्मला मिळाला आहे.द बॉय अँड द हेरॉन’ला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मचा ऑस्कर मिळाला आहे. याचे दिग्दर्शन हायाओ मियाझाकी आणि तोशियो सुझुकी यांनी केले. जस्टिन ट्रायट आणि आर्थर हरारी यांना ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’साठी सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे.अमेरिकन फिक्शन'ला सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा पुरस्कार मिळाला आहे. कॉर्ड जेफरसन लिखित ‘अमेरिकन फिक्शन’ने सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड स्क्रीनप्लेचा ऑस्कर पुरस्कार जिंकला. Ludwig Goransson ला ‘ओपनहायमर’ साठी या वर्षीचा सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.'द झोन ऑफ इंटेरेस्ट'ला बेस्ट साऊंडचा पुरस्कार मिळाला आहे.'ऑस्कर 2024'मध्ये 'द वंडरफुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर'ला लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफीचा पुरस्कार 'ओपनहायमर'ला मिळाला आहे. पुरस्कार स्वीकारण्याआधी सिनेमेट्रोग्राफर Hoyte Van Hoytema ने दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनची भेट घेतली.