Osama Bin Laden Was Fan Of Alka Yagnik: बॉलिवूडच्या 'या' सुप्रसिद्ध गायिकेचा जबरा फॅन होता, दहशतवादी लादेन; कम्प्युटरवर सेव्ह करून ठेवलेली शेकडो गाणी
Osama Bin Laden Was Fan Of Alka Yagnik: दहशतवादी ओसामा बिन लादेन बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिकेचा जबरा फॅन होता. त्याच्या कम्प्युटरमध्ये त्यानं या गायिकेची शेकडो गाणी सेव्ह करून ठेवलेली.

Osama Bin Laden Was Fan Of Alka Yagnik: बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात प्रसिद्ध गायिका अलका याग्निक (Alka Yagnik) या 1980-90 च्या दशकातील एक स्टार आहेत. आजही ज्यांच्या आवाजानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो, त्या सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांचे फक्त देशातच नाहीतर परदेशातही अनेक चाहते आहेत. अगदी लहान वयात त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर स्टारर 'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' या गाण्यामुळे. याजही त्यांच्या चाहत्यांची यादी फार मोठी आहे. पण, याच यादीत दहशतवादी ओसामा बिन लादेनचंही नाव आहे.
ऐकून धक्का बसला ना? बरोबर ऐकताय तुम्ही, दहशतवादी ओसामा बिन लादेन अलका याग्निक यांचा खूप मोठा फॅन होता. 2011 मध्ये जेव्हा सीआयएनं ओसामाच्या एबटाबादमधील घरावर छापा टाकला, तर त्यांना ओसामाच्या कम्प्युटरवर बॉलिवूडची अनेक हिट गाणी सापडली. त्यात उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या सर्वाधिक गाण्यांचा समावेश होता.
लादेन फॅन असल्याचं समजल्यावर काय म्हणालेली गायिका?
ज्यावेळी गायिकेला दहशतवादी ओसामा बिन लादेन तिचा खूप मोठा फॅन असल्याचं समजलं, त्यावेळी त्यांना धक्का बसला. एका मुलाखतीत अनु रंजनशी बोलताना अलका याग्निक म्हणाल्या की, जर ओसामा त्यांचा नंबर 1 फॅन असेल, तर त्यात त्यांची चूक ती काय? गायिका पुढे म्हणालेली की, ओसामा बिन लादेन कोणीही असो, तो कसाही असो, त्याच्यात कधीकाळी एक छोटासा कलाकार नक्कीच असेल. त्याला गाणी आवडत असतील, तर चांगलं आहे नाही का?
अलका याग्निक इंडस्ट्रीत राजकारणाची बळी ठरलेल्या
ओसामा बिन लादेनच्या कलेक्शनमध्ये अजनबी मुझको इतना बता, दिल तेरा आशिकचं टायटल ट्रॅक आणि 1994 चा 'जाने तमन्ना' चित्रपटातील उदित नारायण यांचं 'तू चांद है पूनम का' सारख्या गाण्यांचा समावेश होता. त्याच मुलाखतीत, गायकानं म्हटलं होतं की, राजकारणामुळे त्यांच्याकडून अनेक गाणी हिरावून घेण्यात आली. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांच्यासोबतच्या अनेक गायकांनी खूप घाणेरडं राजकारण केलं आहे. ती ज्या गाण्याची रिहर्सल करायची, ते नंतर दुसऱ्याच एका महान गायकानं गायल्याचं उघड झालेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

