Operation Sindoor : धर्म विचारुन गोळी मारली, आता मोठी किंमत मोजावी लागेल; 'ऑपरेशन सिंदूरवर' बॉलिवूडकरांचा सैन्याच्या शौर्याला सलाम
Operation Sindoor :अनुपम खेर, रितेश देशमुख, हिना खान सारख्या अनेक सेलिब्रिटींनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या प्रतिसादाबद्दल कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

Operation Sindoor : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर आणि पाकिस्तान भारतीय सेनेनं अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. या ऑपरेशनवर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. ही बातमी कळताच अनुपम खेर आणि रितेश देशमुख यांनी 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. तर, हिना खान, चिरंजीवी, देवोलिना भट्टाचार्जी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आहे. सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात.
साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने ट्वीट करत म्हटलं आहे, धर्म विचारुन गोळी मारली, आता तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. जय हिंद. जय भारत. जय हिंद की सेना. तर, अभिनेता रितेश देशमुखने म्हटले आहे की, जय हिंद की सेना...भारत माता की जय..ऑपरेशन सिंदूर.' दिग्दर्शक मधुर भंडारकरने लिहीलं आहे. 'आमच्या प्रार्थना आमच्या सैन्यासोबत आहेत. एक राष्ट्र, आपण सर्व एकत्र उभे आहोत.'
सेलिब्रिटींनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहूयात...
Jai hind. pic.twitter.com/6cMoVgtzUo
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 7, 2025
#operation_sindoor #IndianArmedForces @narendramodi ji
— Paresh Rawal (@SirPareshRawal) May 7, 2025
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भारत माता की जय! 🇮🇳🇮🇳🇮🇳#OperationSindoor
— Anupam Kher (@AnupamPKher) May 7, 2025
View this post on Instagram
Jai Hind Ki Sena … भारत माता की जय !!!! #OperationSindoor pic.twitter.com/OtjxdLJskC
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2025
Our prayers are with our forces. One nation, together we stand. Jai Hind, Vande Mataram. 🇮🇳🙏 pic.twitter.com/IyiOX8hqma
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) May 6, 2025
View this post on Instagram
अभिनेत्री निमरत कौरने लिहिले- 'आपल्या सैन्यासोबत एक व्हा. एक देश. एक मिशन. जय हिंद. ऑपरेशन सिंदूर.' राहुल वैद्यने लिहिले, 'देव आपल्या सैन्याचे रक्षण करो आणि त्यांना दहशतवादाचा नाश करण्यात विजय देवो. जय हिंद'. कंगना राणौत, हिना खान, विक्रांत मेस्सी, चिरंजीवी यांसारख्या स्टार्सनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारने ट्वीट करत म्हटलं आहे, 'जय हिंद, जय महाकाल.' तर अल्लू अर्जुनने लिहिले, 'न्याय मिळाला पाहिजे. जय हिंद.' ज्युनियर एनटीआरने लिहिले, 'भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेसाठी आणि ताकदीसाठी प्रार्थना. ऑपरेशन सिंदूर.'
Jai Hind 🇮🇳 pic.twitter.com/GUyTShnx4H
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) May 7, 2025
Jai Hind 🇮🇳
— Akshay Kumar (@akshaykumar) May 7, 2025
Jai Mahakaal 🚩 pic.twitter.com/h7Z6xJAklH
May justice be served . Jai Hind 🇮🇳 #OperationSindoor pic.twitter.com/LUOdzZM8Z5
— Allu Arjun (@alluarjun) May 7, 2025
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. हे सर्व लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून पहलगामला भेट देण्यासाठी गेले होते. आता भारताने पाकिस्तान आणि पीओकेवर हवाई हल्ले करत ऑपरेशन सिंदूर राबवून या हल्ल्याचा बदला घेतला आहे.
हे ही वाचा :
























