Onkar Bhojane : तो परत आला! हास्यजत्रेत 'कोकण कोहिनूर' ओंकार भोजनेची पुन्हा एन्ट्री, पुन्हा लागणार कॉमेडीचा तडका
Maharashtrachi Hasyajatra : हास्यजत्रा सोडल्यानंतर ओंकार भोजनेचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. आता तो पुन्हा एकदा हास्यजत्रेच्या प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई : मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी असून हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये ओंकार भोजने (Onkar Bhojane) पुन्हा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ओंकार भोजने हास्यजत्रेत पुन्हा दिसणार असल्याने प्रेक्षकांना कॉमेडीचा तडका पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर ओंकार भोजने पुन्हा हास्यजत्रा शोमध्ये दिसणार आहे.
ओंकार भोजने आणि हास्यजत्रा असं एक समीकरण बनलं होतं. पण नंतरच्या काळात ओंकारने हा शो सोडला. त्याला चित्रपटामध्ये संधी मिळाल्यामुळे त्याने हा शो सोडल्याची चर्चा होती. दरम्यानच्या काळात ओंकार भोजनेचा एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला.
Onkar Bhojane News : दिवाळीच्या मुहूर्तावर रि-एन्ट्री
आता दिवाळीच्या मुहूर्तावर ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्यजत्रेमध्ये दिसणार आहे. ओंकारने पुन्हा हास्यजत्रेच्या शूटिंगला सुरवात केली आहे. सोनी मराठी वाहिनीने नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये त्याने खास शैलीतील मामाचे पात्र साकारले आहे. या पात्राने आणि मामांच्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधले.
Onkar Bhojane Maharashtrachi Hasyajatra : हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून ओंकार भोजने घराघरात पोहोचला. त्याचं 'अगं अगं आई...' म्हणणारा ओंक्या हे पात्र असो वा 'हा इथे काय करतोय' विचारणाऱ्या मामा ची भूमिका... ओंकारने आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ओंकारने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
मधल्या काळात त्याने शोमधून ब्रेक घेतला होता, ज्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज झाले होते. हास्यजत्रेने आपल्याला मोठी ओळख दिली असं ओंकारने या आधीही म्हटलं आहे. मात्र तो परत येणार की नाही याबाबत काहीसा संभ्रम होता. पण आता तो पुन्हा येतोय ही बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंददायी आहे.
ओंकार परत येणार असल्याने ऐन दिवाळीत प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुप्पट बोनस मिळणार हे नक्की. नम्रता संभेराव, समीर चौगुले, नम्रता संभेराव आणि वनिता खरात यांच्यासोबत ओंकारची जुगलबंदी पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते.
Maharashtrachi Hasyajatra : गौरव मोरेचं काय?
मधल्या काळात ओंकार भोजने हास्यजत्रा सोडून गेल्यानंतर गौरव मोरेनेही या शोला रामराम केला. आता ओंकार भोजने परत येतोय. त्यामुळे गौरव मोरेही परत येणार का? किंवा त्याचा आणखी काही प्लॅन आहे का याची उत्सुकता मात्र सगळ्यांना लागली आहे.
ही बातमी वाचा:























