एक्स्प्लोर

इंदूला जाहीर झालाय बालपुरस्कार, तर अशोक मा.मा. भैरवीचं चॅलेंज स्विकारणार; कलर्स मराठीवर महारविवार

Marathi Serial Track : कलर्स मराठीवर एका तासाचे विशेष भाग 26 जानेवारीला इंद्रायणी दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता, तर अशोक मा.मा. दुपारी 2 वाजता आणि रात्री  वाजता असणार आहे.

Indrayani Marathi Serial Track : कलर्स मराठीवरच्या (Colours Marathi) गाजलेल्या इंद्रायणी सीरिअलचा (Indrayani Serial) महाभाग 26 जानेवारीला रंगणार आहे. महारविवारच्या विशेष भागामध्ये इंद्रायणी मालिकेमध्ये प्रजासत्ताक दिनी इंदूला बालवीर पुरस्कार मिळणार आहे. इंद्रायणीच्या शूरतेचा नेमका किस्सा काय घडला? का पुरस्कार मिळणार आहे ? हे महारविवारच्या विशेष भागामध्ये कळेलच. तर, अशोक मा.मा. (Ashok Mama Serial) मालिकेमध्ये भैरवीचे चॅलेंज अशोक मा.मा. स्वीकारून आपल्या नातवंडांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी स्वतःच्या हाती घेणार आहेत. कलर्स मराठीवर एका तासाचे विशेष भाग 26 जानेवारीला इंद्रायणी दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता, तर अशोक मा.मा. दुपारी 2 वाजता आणि रात्री  वाजता असणार आहे.

इंदूला जाहीर झालाय बालपुरस्कार

इंद्रायणी मालिकेत शाळेत 26 जानेवारीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाणार आहे ज्यामध्ये बालवीर पुरस्कार देखील दिला जाणार आहे. शाळेमध्ये साजऱ्या होणाऱ्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमात अधू नसल्याने आनंदीबाई जरा खट्टू आहे कारणं परेड मध्ये अधू सहभागी नाहीये, आनंदी बराच गोंधळ घालते त्यामुळे अधूला घेतलं जातं. इंदू, गोपाळ आणि अधू परेड लीड करतात. हे सगळं घडत असताना इंदूला मिळणारे महत्व करिश्माच्या नजरेत खुपतं आहे, आणि त्यामुळे आता ती कोणता रचणार आणि त्यात ती स्वतः च अडकणार का? इंदू  तिला कशी मदत करणार? 26 जानेवारीला असं काय घडणार ज्यामुळे इंदूला बालवीर पुरस्कार  देण्यात येणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. इंदूला हा पुरस्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते मिळणार आहे. इंदू म्हणजेच सांची भोयर याविषयी बोलताना म्हणाली, "आम्ही सगळे त्यादिवशी सकाळी 5.30 वाजता उठलो. आम्ही सेटवर गेल्यावर आमच्या 26 जानेवारीच्या विशेष भागाचे चित्रीकरण सुरु झाले. ज्यामध्ये दिगदर्शक विनोद सरांनी आमच्याकडून परेडची प्रॅक्टिस करून घेतली. मी पहिल्यांदाच करत असल्याने मला जरा अवघड गेले, पण तालीम केल्यांनतर सोपे वाटू लागले. माझ्या हातात मशाल होती, गोपाळच्या हातात ड्रम आणि अधुच्या हातात झेंडा होता. सेटवर एक वेगळीच एनर्जी होती… त्यादिवशी सगळं खूप खास होतं. शूटच्या दिवशी खूप उन्हात उभं राहावं लागतं होतं त्यामुळे स्पॉट दादा आणि युनिट  मधले सगळेच आमची खूप विशेष काळजी घेत होते. शूटच्या दिवशी दुसऱ्या शाळेतील मुलं देखील सेल्फी घ्यायला आले खूप छान वाटतं. आमच्यासाठी हा भाग खूप स्पेशल आहे... तुम्हांला देखील हा भाग नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

अशोक मामा स्विकारणार भैरवीचं चॅलेंज 

अशोक मा.मा. मालिकेत 26 जानेवारी निमित्त सोसायटीने आयोजित केलेल्या मॅचसाठी अशोक मा.मा. ईशानला प्रोत्साहित करतात. ईशान त्यांना मॅच बघायला बोलावतो. भैरवी संयमीच्या मदतीने अशोक मा.मांच्या नकळत एक डाव रचते. अशोक मा.मा. यांना भैरवीनेच पेरलेल्या एका माणसाकडून कॉल येतो, ज्यात तो त्यानां सांगतो शाळेत इंटरव्ह्यूसाठी यावं लागेल.. आता खरा पेच येतो नेमकं मॅचच्या दिवशी ईशानला कळतं की अशोक मा.मा. येऊ शकणार नाहीये. घाबरत खेळणारा ईशान सतत आजोबांना शोधतो आहे. निर्णायक क्षणी अशोक मा.मा. आणि भैरवी तिथे पोहोचतात. बॉल लागल्यानंतरही अशोक मा.मा. ईशानला उठायला सांगतात ईशान उठतो, आत्मविश्वासाने खेळतो आणि संघाला विजय मिळवून देतो. सगळे आनंदात आहेत आणि जल्लोषात विजय साजरा करत आहेत. भैरवी रागात तिकीट फाडते. अशोक मा.मा भैरवीला बजावून सांगतात ईशान आता कुठेही जाणार नाही. त्यावर भैरवी उत्तर देते, "मॅच जिंकलात, पण टुर्नामेंट मीच जिंकणार." आता बघूया भैरवी मा.मा. यांच्यात नक्की विजय कोणाचा होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
स्वबळाचे संकेत, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर, राज्यातील सर्वच जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची सेना भवनला बैठक
Novak Djokovic : तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
तब्बल 24 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनची सेमीफायनल अर्ध्यात सोडली; प्रेक्षकांची जोरदार घोषणाबाजी
Aarti Ahlawat And Virendra Sehwag : आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
आरती सेहवागचा सहा वर्षांपूर्वीच झाला होता विश्वासघात, थेट दिल्ली पोलिसांकडे मागितली होती मदत; नेमकं काय घडलं होतं?
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Embed widget