एक्स्प्लोर

शाहीद कपूरच्या 'ओ रोमिओ'मध्ये मराठमोळ्या गायकाचा पोलिसी खाक्या बघून हरखले प्रेक्षक, पोस्ट व्हायरल

‘ओ रोमियो’मधून बॉलिवूडमध्ये झळकले असून त्यांनी डॅशिंग पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर पाठारे ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार उपस्थितीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

O Romio: शाहीद कपूर सध्या त्याच्या ओ रोमिओ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. शाहीदचा गँगस्टर लूक चाहत्यांना चांगलाच भावतोय. शिवाय या चित्रपटावर सुरु असलेल्या कायदेशीर पेचामुळेही या चित्रपट चर्चेत होता. दरम्यान, सध्या आणखी एका गोष्टीची चर्चा रंगलीय. ही चर्चा आहे एका मराठमोळ्या गायकाच्या  पोलिसी खाक्याची. हा लोकप्रिय गायक आहे राहुल देशपांडे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे ‘ओ रोमियो’मधून बॉलिवूडमध्ये झळकले असून त्यांनी डॅशिंग पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर पाठारे ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या दमदार उपस्थितीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

राहुल देशपांडे यांचा पोलिसी खाक्या चर्चेत 

शास्त्रीय संगीतविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गायक राहुल देशपांडे यांनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रभावी एन्ट्री करत चाहत्यांना चकित केले आहे.'ओ रोमियो’मध्ये राहुल देशपांडे फक्त गायक म्हणून नाही, तर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी चित्रपटात ‘इन्स्पेक्टर पाठारे’ हा खाकी वर्दीतला दमदार रोल साकारला आहे. नेहमी सुरांच्या दुनियेत रमणारे राहुल जेव्हा हातात बंदूक घेऊन पडद्यावर दिसतात, तेव्हा प्रेक्षकांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव होत असल्याचे चित्र आहे.

चाहतेही चकित, पोस्ट चर्चेत 

सोशल मीडियावर त्यांच्या अभिनयाचे अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत. अंकिता शेगडे नावाच्या चाहतीने भावनिक पोस्ट करत राहुल यांच्या मेहनतीचे कौतुक केले असून त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला अभिमानाचा क्षण म्हटले आहे. त्या पोस्टवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गायकीसह अभिनयाची जबाबदारीही राहुल देशपांडे यांनी समर्थपणे पेलल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली असून त्यांच्या सीनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. राहुल यांच्या या बॉलिवूड पदार्पणामुळे मराठी चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita 🌙 (@shedgeankita)

काही दिवसांपूर्वी राहुल देशपांडे यांनी स्वतः ‘ओ रोमियो’चे पोस्टर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. यापूर्वी त्यांनी एका मराठी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी यांच्यासह रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. शिवाय या चित्रपटात राहुल देशपांडे यांच्या डॅशिंग पोलिस अधिकारयाने मराठी प्रेक्षकांना चकित केलं आहे.चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget