Nora Fatehi Car Accident In Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा भीषण अपघात; मद्यधुंद ड्रायव्हरची समोरुन धडक, गाडीचा चक्काचूर
Nora Fatehi Car Accident In Mumbai: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. नोराच्या गाडीला मद्यधुंद ड्रायव्हरनं समोरुन धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Nora Fatehi Car Accident In Mumbai: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) भीषण अपघात (Nora Fatehi Car Accident) झाला आहे. एका दारूच्या नशेत धुंद असलेल्या व्यक्तीनं नोराच्या गाडीला येऊन धडक दिली. महत्त्वाची अपडेट म्हणजे, नोरा पूर्णपणे ठीक आहे. तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. नोराच्या गाडीला मद्यधुंद ड्रायव्हरनं समोरुन धडक दिल्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
नोराचा अपघात कधी आणि कसा झाला?
शनिवारी रात्री नोरा फतेहीचा भीषण अपघात झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री मुंबईत डीजे डेव्हिड ग्वेटा कॉन्सर्टसाठी जात असताना एका मद्यधुंद चालकानं तिच्या गाडीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, या अपघातात नोराच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई पोलिसांनी नोरा फतेहीच्या अपघाताबाबत माहिती जाहीर केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अभिनेत्री नोरा फतेहीचा मुंबईत रस्ता अपघात झाला. एका मद्यधुंद चालकानं तिच्या गाडीला समोरुन धडक दिली. गाडीचं मोठं नुकसान झालंय मात्र, तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे तिची प्रकृती स्थिर आहे. मद्यधुंद चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे."
View this post on Instagram
नोराच्या अपघाताच्या बातमीनं चाहते चिंतेत
नोराच्या अपघाताची बातमी कळताच तिच्या अनेक चाहत्यांना तिच्याबद्दल काळजी वाटली. दरम्यान, जेव्हा अभिनेत्री पूर्णपणे बरी असल्याचं कळालं तेव्हा सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, या अपघातात नोराच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
दरम्यान, नोरा फतेहीनं सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉसमधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण आज तिनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नोरा आज अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या किलर डान्स मूव्हजनं तिनं सर्वांची मनं जिंकली. डान्ससोबतच नोरा अभिनयानंही सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडते. तिनं 2014 मध्ये 'रोर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. तिनं हिंदीसह अनेक तेलुगु आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. नोरा अब कन्नड फिल्म 'केडी - द डेविल' (KD - The Devil) आणि कंचना 4 मध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीचे दोन्ही सिनेमे पुढच्या वर्षी 2026 मध्ये रिलीज होणार आहेत. चाहते तिच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























