एक्स्प्लोर

Nora Fatehi Deepfake : डीपफेकचा प्रकार सुरुच; आता नोरा फतेही झाली शिकार

Nora Fatehi Deepfake : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), कैटरिना कैफ आणि प्रियंका चोप्रानंतर आता नोरा फतेहीचाही (Nora Fatehi) डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये नोरा एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे.

Nora Fatehi Deepfake : अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana), कैटरिना कैफ आणि प्रियंका चोप्रानंतर आता नोरा फतेहीचाही (Nora Fatehi) डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये नोरा एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. नोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला या डीपफेक व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. पोस्ट शेअर करताना नोराने लिहिले की, "धक्कादायक, ही मी नाहीये."

नोराच्या डीपफकेमध्ये काय आहे?

नोराचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये ती फॅशन ब्रँडची जाहिरात करताना दिसत आहे. या सीझन सेल लवकरच समाप्त होईल, असे या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे. नोराचा व्हिडिओ एकदम परफेक्ट बनवला गेलाय. या व्हिडिओमध्ये नोराचा चेहरा, आवाज आणि तिची बॉडी लँग्वेज एडिट करण्यात आली आहे. पाहाणाऱ्या प्रत्येकाला वाटतेच की ही नोरा आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, जो फॅशन ब्रँड या डीपफेक व्हिडिओ बनवण्यामागे करण्यात आला.  त्या कंपनीने सारे आरोप फेटाळले आहेत. लोकांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न होता, असे कंपनीने स्पष्ट केलय. 

रश्मिकाचा डीपफेक बनवणारा पोलिसांच्या ताब्यात 

दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि.20) रश्मिकाचा डीपफेक बनवणाऱ्या आरोपीला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या युनिटने म्हणजेच IFFSO ने आंध्र प्रदेशमधून या व्यक्तीला अटक केली आहे. रश्मिकाचा 6 डिसेंबरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रश्मिकाचा चेहरा दिसत होता. त्यानंतर रश्मिकाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चिंता व्यक्त केली होती. ब्रिटिशा इन्फ्ल्युंसर जारा पटेलच्या बॉडीला रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला होता. 

पुष्पा आणि अॅनिमलसारख्या हिट चित्रपटात काम केल्यानंतर रश्मिकांच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मात्र, डीपफेकचे प्रकरण समोर आल्यानंतर तिने चिंता व्यक्त केली. रश्मिका तेव्हा म्हणाली होती की, हा व्हिडिओ पाहून फार वाईट वाटत आहे. रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावर अशा स्वरुपाचे कृत्य केल्यास काय कारवाई याबाबत इशारा दिला होता. 

सचिन आणि सोनू सुदही डीपफेकचे शिकार 

अभिनेता सोनू सुदचाही (Sonu Sood) डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फसवणूक करणारा व्यक्ती लोकांना पैसे मागताना दिसत होता. सोनू सुदने व्हिडिओ शेअर करुन स्वत: याबाबतची माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी  एका अॅपच्या जाहिरातीसाठी  सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) डीपफेकचा वापर करण्यात आला होता. मात्र, सोनू सुदचे (Sonu Sood) प्रकरण वेगळे होते. या डीपफेकमधून सामान्य लोकांकडून पैशाची मागणी केली जात होती. सोनू सुदच्या नावाने लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Kangana Ranaut on Ram Mandir : 'अयोध्येचा राजा मोठ्या वनवासानंतर घरी परतणार', कंगणाची रणौत पोस्ट चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget