एक्स्प्लोर

Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??

गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात.

नवी दिल्ली : बिग बॉस ओटीटी विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव याच्यावर (Noida Police has launched a probe against YouTuber Elvish Yadav) नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याचा (allegedly supplying snake venom at rave parties) आरोप आहे. या संदर्भात पोलिसांनी एल्विशसह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एल्विश यादव व्हिडिओ बनवतो आणि नोएडामधील त्याच्या फार्म हाऊसमध्ये विषारी आणि जिवंत सापांसह रेव्ह पार्ट्या आयोजित करतो, असे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. या पार्टीला परदेशी मुलीही हजेरी लावतात आणि सापाचे विष ड्रग्जप्रमाणे घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. 

साप चावून घेत नशा करण्याचा ट्रेंड

गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील रेव्ह पार्ट्यांमध्ये (allegedly supplying snake venom at rave parties) सापाच्या विषाची मागणी वाढत असल्याचे बोलले जात आहे. नशेसाठी लोक सापाच्या विषाकडे आकर्षित होत आहेत. 'द संडे गार्डियन'ने काही काळापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तात म्हटले होते की, दिल्लीतील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषापासून बनवलेल्या गोळ्या घेण्याचा किंवा साप चावून घेत नशा करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.

वाचा : Top 5 Banned Movies : या 5 चित्रपटात अभिनेत्रींनी लाज सोडून दिल्याने चित्रपट थेट YouTube वर रिलीज झाले; सेन्साॅरने परवानगी दिलीच नाही!

लोक सापाचा दंश करून घ्यायलाही तयार 

दिल्लीस्थित पीआर प्रोफेशनलनी दिलेल्या माहितीनुसार सापाच्या विषामुळे होणारा नशा हा एक नवीन प्रकारची नशा आहे जो ड्रग्ज घेणार्‍या लोकांना खूप आवडतो. ते पुढे म्हणतात, 'गेल्या काही वर्षांत सापाच्या विषाने पार्ट्यांमध्ये प्रभाव वाढवला आहे, पण बहुतेक लोक ते विकत घेऊ शकत नाहीत. सापाचे विष सहज मिळणे फार कठीण आहे. नशेसाठी लोक सापाचा दंश करून घ्यायलाही तयार असतात. त्यामुळे त्यांची शक्ती वाढल्याचे त्यांना वाटते आणि उत्साह येतो. जर एखाद्याला एकदा व्यसन लागलं तर तो नक्कीच पुन्हा व्यसनाच्या आहारी येतो. पार्ट्यांमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही औषधांच्या तुलनेत सापाच्या विषाची नशा खूप शक्तिशाली असते.

तस्करी करणाऱ्या लोकांकडून कोब्रा सहज उपलब्ध 

त्यांनी सांगितले की जे लोक सापाचे विष घेतात ते बहुतेक वेळा विषारी नागाचे विष नशेसाठी वापरतात. कोब्रा विषाचे पावडरमध्ये रूपांतर करून नंतर सेवन केले जाते. सर्पमित्र आणि सापांची तस्करी करणाऱ्या लोकांकडून कोब्रा सहज उपलब्ध होतो. कोब्राच्या विषापासून बनवलेली पावडर ड्रिंक्समध्ये मिसळून नशा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक घटनांमध्ये या विषाच्या वापरामुळे मृत्यूही झाल्याचे दिसून आले आहे.

सापाच्या विषापासून बनवलेल्या गोळीची किंमत किती? 

रेव्ह पार्ट्यांची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, पार्ट्यांमध्ये सामान्य औषधांच्या गोळीची किंमत 2,000 ते 5,000 रुपये असते, तर सापाच्या विषापासून बनवलेल्या गोळीची किंमत 25,000 रुपयांपेक्षा जास्त असते. जे लोक सापाच्या विषापासून औषध बनवतात ते तस्कर किंवा सर्पमित्रांकडून साप विकत घेतात. आंतरराष्‍ट्रीय बाजारात अर्धा लिटर सापाच्या विषाची किंमत 10 लाखांहून अधिक असल्याचे अंमली पदार्थ विभागाचे अधिकारी सांगतात.

सापाचे विष ऊर्जा देते!

गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. जर तुम्ही विष कमी प्रमाणात घेतले असेल तर तुम्ही 6-7 तास नशेत राहता आणि जर तुम्ही थोडे जास्त घेतले तर तुम्ही 5-6 दिवस नशा करता. थेट साप चावला तर नशा जास्त होते. ज्यांनी ते घेणं सुरू केलं आहे त्यापैकी बहुतेकांचे म्हणणे आहे की, त्यांनी ते शाळा किंवा महाविद्यालयात असताना घेणे सुरू केले. ग्रामीण भागात सापाचे विष सहज उपलब्ध आहे.

पीआर प्रोफेशनलने दिलेल्या आणखी माहितीनुसार काही मुलं अनेकदा शाळेच्या भिंतीवर चढून सर्पमित्र त्यांना सापाचे विष देत असत. मुलं किशोरवयात हेरॉईन आणि कोकेनसारखी ड्रग्ज घ्यायला लागतात, पण काही काळानंतर ही ड्रग्ज त्यांना हवी तशी चमत्कारिक नशा देऊ शकत नाहीत. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते नवीन औषधे शोधू लागतात आणि त्यांच्यामध्ये सापाचे विष सर्वोत्तम आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?
रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, बाजारात एका दिवसात काय घडलं?
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
Embed widget