एक्स्प्लोर

Nishaanchi Trailer Out: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री; अनुराग कश्यप दिग्दर्शित 'निशानची'मध्ये ऐश्वर्य ठाकरेचा डबल रोल

Nishaanchi Trailer Out: 'निशानची'चा ट्रेलर प्रेक्षकांना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, थेट उत्तर प्रदेशातील छोट्या शहरातील गजबजलेल्या गल्लीत घेऊन जातो.

Nishaanchi Trailer Out: अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या वतीनं आज त्यांच्या आगामी, सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या 'निशानची' (Nishaanchi Trailer) या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित केला. अनुराग कश्यप दिग्दर्शित, हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला मनोरंजनपट खऱ्या अर्थानं मोठ्या पडद्यावरील भव्य प्रदर्शनाचं आश्वासन देतो. सिनेप्रेमींना आवडणारे प्रत्येक घटक म्हणजे अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी, मां का प्यार आणि फिल्मी समावेश असलेला तगडा ट्रेलर आहे. 

नवोदित ऐश्वर्य ठाकरेच्या (Aaishvary Thackeray) तडफदार दुहेरी भूमिकेसह, 'निशानची'चे कथानक जुडवा भाई बबलू आणि डबलू यांच्या खिळवून ठेवणारे जीवन उलगडते- या व्यक्ति रेखांच्या आस्थेच्या अगदी विरुद्ध असलेली प्रतिबिंब. या सिनेमाची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्स अंतर्गत, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने केली असून प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, तसेच अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब, त्याचप्रमाणे कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'निशानची' हा सिनेमा 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

'निशानची'चा ट्रेलर प्रेक्षकांना 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, थेट उत्तर प्रदेशातील छोट्या शहरातील गजबजलेल्या गल्लीत घेऊन जातो. जिथे बबलू निशानची, रंगीली रिंकू आणि डबलू यांचे जीवन अनपेक्षित मार्गांनी धडकते. थक्क करणारा पाठलाग, शिट्टी-मार संवाद, मातीतला देशी संघर्ष आणि हळुवार प्रेमाच्या कोमल क्षणांसह, हे चुंबकीय कथानक जितके अस्ताव्यस्त आहे तितकेच अस्ताव्यस्त जग रंगवते. हसवणारा धमाल विनोद आणि 'अनफिल्टर्ड देसी स्वॅग'सह हा ट्रेलर बंडखोरी, प्रणय आणि शत्रुत्वाची नाडी समान प्रमाणात हेरतो. थिरकायला लावणाऱ्या तालांनी आणि लार्जर देन लाईफ कथा प्रेक्षकांना त्यांच्या आसनावर खिळवून ठेवते. एक स्फोटक कथा पुढे सरकत जाते; जी उलगडण्याची वाट प्रेक्षक पाहत राहतील.

'निशानची'चे दिग्दर्शक आणि सहलेखक अनुराग कश्यप म्हणाले की , "अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया’ सोबत काम करणे अत्यंत फलदायी ठरले. कारण त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. ऐश्वर्य, वेदिका, मोनिका, झिशान, कुमुद आणि या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने केवळ अभिनयच केला नाही, तर या पात्रांसोबत जगले आणि श्वास घेतला. कथेप्रती त्यांची बांधिलकी आणि अभिनयाची सत्यता या कलाकृतीत चमकते. माझ्या टीमने त्या उत्कटतेची जुळवाजुळव फ्रेम-टू-फ्रेम केली आहे. ज्यामुळे सिनेमा इतका चांगला बनला. शिवाय त्याच्या संगीतातदेखील तीच भावना सिनेमातून वाहते आणि कथेत भर घालते. प्रेक्षकांना हे संगीत खरोखरच आवडेल मला याची खात्री वाटते."

पाहा ट्रेलर : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget