Nisha Madhulika : प्राजक्ता कोळी किंवा कामिया जानी नाही; कुकिंग चॅनल बनवून ठरली ही महिला ठरली सर्वात श्रीमंत यूट्यूबर, नेटवर्थ जाणून चकित व्हाल
India’s Richest Female You Tuber Nisha Madhulika : शिक्षिकेपासून शेफ झालेली महिला यूट्यूबर निशा मधुलिका सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर आहे.
India’s Richest Female You Tuber : सोशल मिडिया फक्त मनोरंजनासाठी नसून ते एका पैसे कमावण्याचंही उत्तम साधन आहे. अनेक कंटेंट किएटर्स आणि सोशल मिडिया एन्फ्लूएंसर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावतात. तुम्ही आतापर्यंत अनेक सोशल मिडिया एन्फ्लूएंसर आणि यूट्यूबरबद्दल ऐकलं असेल, पण आज आम्ही तुम्हाला सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबरबद्दल सांगणिर आहोत.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर
YouTuber निशा मधुलिका या भारतातील प्रसिद्ध कंटेट क्रिएटर्सपैकी एक आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर आहेत. निशा मधुलिका यांनी किचन रेसिपींज शेअकर करत मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यांच्या स्वयंपाकाने सर्वांच्या मनात घर केलं आहे. निशा मधुलिका यांच्या रेसिपीज खूप लोकप्रिय आहेत. शिक्षिका निशा असलेल्या निशा यांनी आवड म्हणून यूट्यूबर रेसिपी शिकवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला.
2011 मध्ये सुरू केलं YouTube चॅनल
निशा मधुलिका या शाळेत शिक्षिका होत्या. मुलांना शिकवत असताना त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार केला आणि 2011 मध्ये त्यांनी YouTube चॅनल सुरु केलं. त्यांनी त्यांची स्वयंपाकाची शैली आणि वेगवेगळ्या पाककृतींमुळे सर्वांनाच आपला फॅन बनवलं. निशा मधुलिका यांनी वयाच्या 50 शीमध्ये स्वयंपाक करण्याची आवड म्हणून हे चॅनल सुरु केलं आणि प्रसिद्धी मिळवली. यूट्यूबवर व्हिडीओ बनवून निशा यांनी लोकांना स्वयंपाकाच्या नवीन पद्धती शिकवल्या.
भारतातील टॉप YouTube शेफच्या यादीत सामील
निशाने YouTube वर सतत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि 2014 पर्यंत त्या भारतातील टॉप YouTube शेफच्या यादीत सामील झाल्या. 2017 मधील सोशल मीडिया समिट आणि अवॉर्ड्समध्ये निशा मधुलिकाला YouTube कुकिंग कंटेंट क्रिएटर म्हणून नामांकन मिळालं. निशा मधुलिका यांचा शिक्षक ते YouTuber असा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरला आहे.
View this post on Instagram
10 लाखांहून अधिक फॉलोअर्स
2016 मध्ये, द इकॉनॉमिक टाइम्सने भारतातील टॉप 10 YouTube सुपरस्टार्सच्या यादीत निशा मधुलिकाचा समावेश केला होता. व्होडाफोनच्या वुमन ऑफ प्युअर वंडर कॉफी टेबल बुकमध्येही त्यांचा समावेश होता. निशा यांनी 2020 मध्ये यूट्यूबवर 10 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आणि यासाठी तिला यूट्यूबकडून डायमंड प्ले बटणही मिळालं.
40 कोटींहून अधिक संपत्ती
आतापर्यंत निशा मधुलिका यांचे इंस्टाग्राम हँडलवर 337K फॉलोअर्स आहेत, तर त्यांच्या YouTube चॅनेलवर 14.2 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. याशिवाय फेसबुकवर त्यांचे 5.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार, 65 वर्षीय निशा मधुलिका आज सर्वात श्रीमंत महिला यूट्यूबर बनल्या आहेत. निशा मधुलिका यांची एकूण संपत्ती 43 कोटी रुपये आहे.