एक्स्प्लोर

'स्मशानात राहून जनतेची कामे करु', स्मशानाजवळील बंगला मिळाल्याने बच्चू कडू नाराज

याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शुभ अशुभ यापेक्षा अपंगांना सोयीचा असणारा बंगला व कार्यालय हवे होते. तरीही सध्या मिळालेले कार्यालय स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

मुंबई : आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू हे नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाराजीचे कारण आहे त्यांना मिळालेला बंगला. हा बंगला स्मशानभूमीच्या शेजारी असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या अपंग आणि रुग्णांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय तसेच मंत्रालया शेजारील बंगल्याची मागणी केली होती. परंतु काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येथील स्मशानाजवळील रॉकी हिल 1202 हा फ्लॅट दिला असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शुभ अशुभ यापेक्षा अपंगांना सोयीचा असणारा बंगला व कार्यालय हवे होते. तरीही सध्या मिळालेले कार्यालय स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याआधीही बंगलेवाटपावर  मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली होती. प्रत्येकालाच मनपसंतीच्या खात्याप्रमाणे पसंतीचा बंगला हवा आहे. पण सध्या तसं होताना दिसत नाही. प्रत्येकजण आपल्या पसंतीच्या बंगल्यासाठी लाॅबिग करताना दिसत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारासाठी उशीर झालाय त्यात बंगलेवाटपानंतर अनेकांची धुसपूस समोर येत आहे. आदित्य ठाकरेंना ए 6 बंगला देण्यात आला आहे. पण त्या बंगल्यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं नाव लावण्यात आलं आहे. उपसभापती निलम गोऱ्हे यांचा बंगला के सी पाडवींना देण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना शिवसेनेचं कार्यालय असलेला शिवालय बंगला देण्यात आला आहे. तर कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा बंगला काँग्रेसच्या अमित देशमुख यांना देण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांना बी 1  हा बंगला देण्यात आला आहे. पण हा बंगला विजय वड्डेटीवार यांच्याकडे असल्यामुळे तेही सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. मंत्रिपदावरून नाराजी, खातेवाटपावरून नाराजी आणि आता बंगल्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं दिसतं आहे. प्रत्येकालाच आपल्या पसंतीचा बंगला हवंय पण सध्या ते शक्य नसल्यानं अतंर्गत धुसुपुस वाढत चालली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget