एक्स्प्लोर

नील सालेकरची नवी मुहूर्तमेढ "मराठी माइंडेड"; मराठी अस्मितेचा डिजिटल हब, स्टोरीटेलिंगमध्ये क्रांती घडवणारी संकल्पना

इतिहास, आहार, संस्कृती, मनोरंजन, संगीत, फॅशन आणि क्रीडा यांसारख्या विषयांवर आकर्षक कंटेंटद्वारे ही एजन्सी सर्व मराठी गोष्टींसाठी एक आदर्श मंच होण्यासाठी सज्ज आहे.

मुंबई : कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्क आणि कंटेंट क्रिएटर नील सालेकर (Instagram) (उर्फ Just Neel Things) यांनी मिळून 'मराठी माइंडेड' या नव्या क्रिएटिव्ह एजन्सीची घोषणा केली आहे, ही एजन्सी जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी सांस्कृतिकरित्या समृद्ध बँड कम्युनिकेशन तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. नीलच्या नेतृत्वाखाली, मराठी (Marathi) माइंडेड ही एक परिपूर्ण सेवा देणारी क्रिएटिव्ह एजन्सी असणार आहे, जी मराठी दृष्टीकोन समजून बॅण्ड्ससाठी कॅम्पेन्स घडवेल. केवळ एजन्सी म्हणून मर्यादित न राहता, मराठी अस्मितेचा डिजिटल हब बनण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. 

इतिहास, आहार, संस्कृती, मनोरंजन, संगीत, फॅशन आणि क्रीडा यांसारख्या विषयांवर आकर्षक कंटेंटद्वारे ही एजन्सी सर्व मराठी गोष्टींसाठी एक आदर्श मंच होण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक व्यवसाय असो की किंवा जागतिक बँड्स, मराठी माइंडेड महाराष्ट्र व त्यापलीकडील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सल्लागार सेवा आणि सर्जनशील मार्गदर्शन देईल.

कोण आहे नील सालेकर?

29 लाखांहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला नील सालेकर हा एक बहुआयामी कंटेंट क्रिएटर आहे. त्याने आपल्या विनोदी व्लॉग्स आणि मनोरंजक कंटेंटमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. D'evil सोबतचं त्याचं गाणं Jinklo आणि Shehensha-E-Qawwali हा त्याचा खास कव्वाली शो यामधून त्याची संगीत क्षेत्रामधील चुणूक देखील प्रेक्षांसमोर आली. त्याने Amazon Mini TV वरील Constable Girpade या मालिकेतून अभिनयातही पदार्पण केलं आहे. आता मराठी माइंडेडच्या माध्यमातून, तो आपली सांस्कृतिक समज आणि सर्जनशील क्षमता ब्रेड स्टोरीटेलिंगमध्ये वापरणार आहे.

12 तास बिनधास्त

मराठी माइंडेडने पहिल्याच कॅम्पेनद्वारे दमदार सुरुवात केली आहे डेटॉलच्या '12 तास बिनधास्त' च्या रूपात. हे कॅम्पेन डेटॉल इंडियासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, जिथे बँडने मराठी घरा-घरातील दृश्यांना अनुसरून महाराष्ट्रातील ग्राहकांशी आणखी सखोल नातं निर्माण करण्याची दिशा घेतली आहे. 'बिनधास्त' या शब्दातून डेटॉलवरील विश्वास अगदी अचूकपणे व्यक्त होते. मग तो मुंबईच्या रस्त्यावरून हिंडणारा एखादा विद्यार्थी असो, दररोजच्या आव्हानांना सामोरे जाणारा प्रोफेशनल असो, किंवा सण साजरे करणारा परिवार 'बिनधास्त' हीच मराठी जीवनशैली आहे.

काय आहे 12 तास बिनधास्त

या कॅम्पेनबद्दल बोलताना, रेकिट हेल्थ च्या, साउथ एशिया विभागाच्या रिजनल मार्केटिंग डायरेक्टर कनिका कालरा म्हणाल्या, ""१२ तास बिनधास्त' या कॅम्पेनद्वारे आम्ही मराठी माणसाचा विचार करून संवाद निर्माण करत आहोत- जो महाराष्ट्राच्या सळसळत्या संस्कृतीशी पूर्णपणे सुसंगत आहे. मराठी माइंडेडसोबत केलेल्या या कॅम्पेन मधून आम्ही स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वास, ऊर्जा आणि बेधडक आयुष्य जगण्याच्या विचारांना प्राधान्य दिले आहे. आम्हाला विश्वास आहे की हे कॅम्पेन मराठी ग्राहकांशी आमचं नातं अधिक घट्ट करेल." डेटॉलच्या १२ तास संरक्षणाच्या मूळ विश्वासाशी सुसंगत असे हे कॅम्पेन डेटॉल साबणाला केवळ स्वच्छता नाही तर एक आत्मविश्वास देणारा साथीदार म्हणून प्रस्तुत करते, जो तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम बनवतो.

ध्रुव चितगोपेकर काय म्हणाले

"मराठी माइंडेडद्वारे आम्ही एक अशी सांस्कृतिक चळवळ घडवून आणत आहोत जी प्रामाणिकता, सर्जनशीलता आणि अस्सल मराठी भावना यावर आधारित आहे, असे कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कचे सह-संस्थापक ध्रुव चितगोपेकर यांनी म्हटले. तसेच, नील हा नव्या युगातील कंटेंट क्रिएटरचा प्रतिनिधी आहे जो प्रेक्षकांची नाडी ओळखतो आणि त्या अनुभवांमधून बॅण्ड्ससाठी प्रभावी कथानके उभी करू शकतो. डेटॉलसोबतचे आमचे हे कॅम्पेन राष्ट्रीय पातळीवरचे बॅण्ड्स स्थानिक कथानकांमधून प्रभाव कसा पाडू शकतात याची ग्वाही देते. स्थानिक कथानके हे केवळ जाहिरातींचं भविष्य नाही, तर ती एक खरी 'कनेक्टेड इंडिया' तयार करण्याची दिशा आहे."

कंटेंट क्रिएटर नील सालेकर म्हणतो..

"कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कसोबत हात मिळवून मराठी संस्कृती साजरी करणारी ही नवीन सुरूवात करताना मला अतिशय आनंद होत आहे. या प्रक्रियेत सुरुवातीपासून सहभागी राहणं - पारंपरिक मराठी जाणिवा आणि आजच्या तरुणाईशी त्यांचा मिलाफ हि माझ्यासाठीही एक मोठी शिकवण आहे. मराठी माइंडेड हि केवळ एक एजन्सी नसून, कंटेंट आणि बॅण्ड्सचं असं जग आहे, जिथे महाराष्ट्र आणि मराठी माणूस भारतात असो वा परदेशात यांचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केलं जाईल."
प्रामाणिक प्रतिनिधित्वाचं महत्त्व ओळखून, मराठी माइंडेडने महाराष्ट्राच्या विविध भागांतील चार कंटेंट क्रिएटर्ससोबत एकत्र येत, '१२ तास बिनधास्ता' कॅम्पेनसाठी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कंटेंट तयार केलं आहे. हे कॅम्पेन दररोजच्या जीवनात डेटॉलचा प्रवेश सहजतेने घडवते जेणेकरून डेटॉल केवळ एक उत्पादन न राहता, मराठी जीवनशैलीचा भाग बनेल.

दरम्यान, मराठी माइंडेडद्वारे, कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्क भारतातील ब्रेड स्टोरीटेलिंगच्या परिभाषा नव्याने ठरवत आहे -जिथे स्थानिक कथानकं अग्रस्थानी असतील. ही एका अश्या चळवळीची सुरुवात आहे, जी बँड्सना त्यांच्या प्रेक्षकांशी सखोल संवाद साधायला मदत करेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Embed widget