Nayantara Birthday: विवाहित प्रभुदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्नाचा प्रस्ताव घेऊन थेट पत्नीकडं गेली अन्..
या अभिनेत्रीची लाईफ ही अनेक बॉलिवूड अभिने़त्रींप्रमाणे काहीशी निसरड्या वळणावरची समजली जाते. तिचं नाव प्रभुदेवाशी कायम जोडले जाते.
Nayantara Birthday:साऊथचा सुपरस्टार प्रभुदेवा याचे असंख्य फॅन्स आहेत. त्याच्या डान्ससह अभिनयावर लाखो फिदा आहेत. पण प्रभुदेवासाठी साऊथची एक अभिनेत्री इतकी वेडी झाली होती की प्रभू देवाचं लग्न झालेलं असतानाही तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. आणि कमाल म्हणजे लग्नाचा प्रस्ताव घेऊन ती थेट प्रभू देवाच्या पत्नीकडं गेली होती. कोण आहे ही अभिनेत्री? साऊथची सुपरस्टार समजली जाणारी नयनतारा आपल्या अदाकारीनं आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर कायमच समोर आली आहे.नयनतारा ज्या भूमिकेत जाते त्या भूमिकेची ढाल बनते. तिची एक झलक पाहण्यासाठी जगभरातील लोक आतूर होतात. बॉक्सआफीसवर नयनताराच्या फिल्म्स प्रचंड चालतात. १८ नोव्हेंबर २०२४ ला नयनतारा तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमधून काम केल्यानंतर नयनतारानं अलीकडेच सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जावान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.
प्रभुदेवाशी लग्न करायचं होतं
नयनताराची लव्ह लाईफ ही अनेक बॉलिवूड अभिने़त्रींप्रमाणे काहीशी निसरड्या वळणावरची समजली जाते. नयनताराचं नाव प्रभुदेवाशी कायम जोडले जाते. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. नयनतारा ही प्रभुदेवासाठी वेडी झाली होती. तिला प्रभुदेवाशी लग्न करायचं होतं. पण त्यावेळी प्रभूदेवाचं लग्न झालेलं होतं. प्रभुदेवाच्या पत्नीला या नात्याची माहिती मिळताच तिनं म्हणजेच रामलता यांनी प्रभूदेवाला नयनतारापासून लांब रहायला सांगितलं होतं. आणि जर त्यानं तसं केलं नाही तर ती अन्नपाणी सोडून देईल असंही सांगितलं होतं.
थेट प्रभुदेवाच्या पत्नीकडेच गेली..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराला प्रभुदेवाशी लग्न करायचं होतं. पण त्याची पत्नी त्यांच्या नात्यातला अडसर ठरतेय असं समजल्यावर लग्नाची परवानगी मागण्यासाठी नयनतारा थेट रामलता म्हणजेच प्रभुदेवाच्या पत्नीकडे गेली होती. त्यांनी नयनताराला सोन्याची नाणी, ८५ लाख रुपयांचा हारही भेट दिल्याचं सांगितलं जातं. असं असतानाही रामलता यांनी प्रभुदेवाला सोडण्यास नकार देत कोर्टात धाव घेतली होती.
नयनतारानं आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला
प्रभुदेवाच्या प्रकरणामुळं नयनतारालाही मानसिक त्रास झाला. पण खचून न जाता तिनं आयुष्यात पुढं जाण्याचा निर्णय घेतला. आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन याच्याशी लग्न केलं. २०२२ मध्ये विघ्नेशशी लग्न तिनं केलं. आता ही अभिनेत्री जुळ्या मुलांची आई आहे.
हेही वाचा:
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती