Nana Patekar With Dhananjay Munde : उशिरा का आलात, नाना पाटेकरांनी भर मंचावर धनंजय मुंडेंची फिरकी घेतली!
Nana Patekar with Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कार्यक्रमात यायला उशीर झाला त्यामुळे नाना पाटेकरांनी त्यांची सगळ्यांसमोरच फिरकी घेतली.
Nana Patekar with Dhananjay Munde : अनेकदा बरेच कार्यक्रम एकाच दिवशी असतात म्हणून राजकीय नेत्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे बऱ्याचदा कार्यक्रमांचा खोळंबा होतो तर काही कार्यक्रम त्यांच्या वेळेनुसार सुरु देखील होतात. अशाच एका कार्यक्रमात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उशीर झाला. पण त्यांनी भर कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी चांगलीच फिरकी घेतली.
धनंजय मुंडे यांना कायक्रमात यायला उशीर का झाला असा सवाल नाना पाटेकरांनी त्यांना विचारला. नाना पाटेकरांच्या या प्रश्नावर संपूर्ण कार्यक्रमात एकच हशा पिकला. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफन व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळातंय. पण या कार्यक्रमात नेमकं काय झालं ते सविस्तर जाणून घेऊयात.
नेमकं काय घडलं?
लोकमत समूहाकडून लोकमत सरपंच पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. तसेच यावेळी नाना पाटेकर आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे देखील आमंत्रित होते. यावेळी नाना पाटेकरांचं मंचावर भाषण सुरु असतानाचा धनंजय मुंडेंची एन्ट्री झाली. त्यावेळी नाना पाटेकरांनी धनंजय मुंडेंना जवळ बोलावून त्यांची फिरकी घेतली.
उशीर का झाला? नानांचा धनंजय मुंडेंना सवाल
धनंजय मुंडेंची एन्ट्री होताच नानांनी म्हटलं की मुंडे साहेब एकदम वेळेवर आलेत. पुढे नानांनी त्यांना बोलावून म्हटलं की, उशीरा का आलात ते सांगा पहिल्यांदा. त्यानंतर कार्यक्रमातील मंडळींना आणि धनंजय मुंडेंनाही हासू आवरलं नाही. त्यावर धनंजय मुंडेंनी म्हटलं की, मी माझ्या भाषणात का सांगतो की मला उशीर का झाला. नानांनी म्हटलं की, भाषणात नाही आता सांगा. तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की, खरंतर नानांच्या समोर पुढारी जरी असलो तरीही खोटं बोलता येत नाही. खरंच सांगतो थोडासा पॅनक्रिया आणि इंटेस्टाईनचा आजार आहे. आज सकाळी त्यासाठी डॉक्टरकडे जायचं होतं. डॉक्टरकडे जायला थोडा उशीर झाला म्हणून इथे यायाला उशीर झाला.
गौरव मोरे आणि नाना पाटेकरांची भेट
याच कार्यक्रमात गौरव मोरे आणि नाना पाटेकरांची देखील भेट झाली. गौरवने नानांसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. अनेकांनी गौरवच्या या फोटोवर कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा :
Gaurav More : 'ज्यांना बघून आपण काम करतोय...', गौरव मोरे आणि नाना पाटेकरांची ग्रेट भेट