Gaurav More : 'ज्यांना बघून आपण काम करतोय...', गौरव मोरे आणि नाना पाटेकरांची ग्रेट भेट
Gaurav More : गौरव मोरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. या भेटीचे फोटो गौरवने शेअर केलेत.
Gaurav More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून घरोघरी पोहचलेला अभिनेता गौरव मोरे (Gaurav More) हा मागील काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. गौरव हा सोनी टिव्हीवरील 'मॅडनेसे मचाऐंगे' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पण त्याच्या या कार्यक्रमातील विनोदांवर प्रेक्षक काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच गौरव हा सध्या त्याच्या अल्याड पल्याड सिनेमामुळे चर्चेत आलाय. नुकतच गौरवने अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांची भेट घेतली.
गौरवने त्याच्या सोशल मीडियावर नाना पाटेकरांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. गौरवने या फोटोला दिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एका कार्यक्रमादरम्यान गौरवरची आणि नाना पाटेकरांची भेट झाली. गौरवच्या या फोटोवर कलाकारांनी देखील कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
गौरवची पोस्ट नेमकी काय?
गौरवने नाना पाटेकरांचा फोटो शेअर करत त्यावर म्हटलं की, काय बोलु सुचत नाहीये.पाठीवरुन हात फिरवला,आशीर्वाद दिला आणि खुप कौतुक केलं.ज्यांना बघुन आपण काम करतोय,ज्यांच्याकडून आपण कायम शिकत राहु असे आपले लाडके श्री. नाना पाटेकर साहेब. दरम्यान लोकमत सरपंच पुरस्कार सोहळ्यात गौरव आणि नाना पाटेकरांची ही भेट झाली.
View this post on Instagram
गौरव मोरेबद्दल जाणून घ्या...
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. फिल्डरपाड्याचा गौरव मोरे या नावाने तो प्रेक्षकांचा पसंतीस देखील उतरला. त्यानंतर गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. गौरवने छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामध्ये बॉईज 4, हवाहवाई, लंडन मिसळ, बाळकडू या सिनेमांचा समावेश आहे. नुकताच गौरव हा अल्याड पल्याड सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्याचा हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच गौरवने हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो सध्या सोनी टीव्हीवरील मॅडनेसे मचाऐंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
ही बातमी वाचा :