एक्स्प्लोर

Nana Patekar On Politics :  मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर, निवडणूक लढवण्यावर नाना पाटेकर यांचे मोठं वक्तव्य

Nana Patekar On Politics:  शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली.

Nana Patekar On Politics:  मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी  सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. 

आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर यांनी म्हटले की, ⁠मला सर्वच पक्षातून ॲाफर आहे. पण मला ते जमणार नाही, ⁠लोकांनी ठरवले पाहिजे. ⁠मी मूळात राजकारणात जावू इच्छित नसल्याचेही त्यांनी म्हटले. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नाना पाटेकर यांनी मला कळवा कुठून निवडणूक लढवायची असा उलट प्रश्न केला.⁠कितीही प्रश्न विचारले तरे तुम्ही मला पकडू शकत नाही असेही नाना पाटेकर यांनी म्हटले. नाम फाऊंडेशनची सुरुवातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाल्या आहेत. ⁠हमी भाव योग्य मिळाला तरच आत्महत्या रोखतां येतील. ⁠या सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगतया गोष्टी चुटकी सरशी सुटतील असं नाही हेदेखील नाना पाटेकर यांनी नमूद केले. 

आता सरकारकडे मागू नका, तर... 

आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन  नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनात केले होते. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली. 

नटसम्राट आज करावे लागले तर वेगळ्या पध्दतीने करेल. नटसम्राटाचे दुःख जे आहे ते चार भिंतीमधील आहे. गोंजारलेले दुःख आहे, आम्ही मात्र सर्व आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते, त्याचा एक रास्त भाव आहे तो द्या, यापलीकडे काय मागणे मागितले. काय ते मागू नका, आता सरकार कोणते करायचे ते ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात ते ओठात येते, मला पक्षातून काढतील, असेही नाना पाटेकर यांनी यावेळी म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Embed widget