Gulabi Sadi : बबीताजीलाही लागलं 'गुलाबी साडी'चं वेड, संजू राठोडही म्हणाला 'भारीच'; पण जेठालालच्या कमेंट्सचाच पाऊस
Munmun Dutta Video on Gulabi Sadi song : जगप्रसिद्ध गुलाबी साडीवर तारक मेहता फेम बबीताने देखील व्हिडिओ केला असून तिच्या या रिलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Munmun Dutta Video on Gulabi Sadi song : संजू राठोडच्या (Sanju Rathod) 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याने अक्षरश: जगाला वेड लावलं. अगदी सर्वसामान्यांपासून ते माधुरीसह अनेक कलाकार मंडळींनी यावर व्हिडिओ केला. इतकचं नव्हे तर न्युयॉर्क टाईम्स स्क्वेअरवरही हे गाणं वाजलं. जगभरातील लोकांना या गाण्यावर व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही. त्यातच आता तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातील बबीताजी म्हणजेच मुनमुन दत्तालाही (Munmun Dutta ) वेड लावलं आहे.
मुनमुनने तिच्या गुलाबी साडीवरचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर हे गाणं लिहिणारा संजू राठोडने देखील कमेंट केली आहे. संजूने मुनमुनच्या या व्हिडिओवर भारीच अशी कमेंट केली आहे. पण मुनमुनच्या या व्हिडिओवर जेठालालच्याच जीआएफच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मुनमुनच्या या व्हिडिओवर जेठालालच्या मीम्सचा पाऊस पडला आहे.
असं तयार झालं गुलाबी साडी गाणं
संजूने सकाळ वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, गुलाबी साडी हे गाणं मी दिवाळीच्या दिवशी लिहिलं. माझ्या डोक्यात चालू होतं काय करायचं, तेव्हा माझ्या काही कारणांमुळे मी दिवाळीला घरी देखील नव्हतो गेलो. मग घरी बसून काय करायचं हा विचार सुरु होता. तेव्हा वाटलं की नवीन काहीतरी शोधूया. तेव्हा वाटलं की प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो आणि नऊवारी साडी हे गाणं होतंच. मग नऊवारी साडीचा सिक्वेल आहे तर त्याच्याशीच संबंधित गाणं हवं. म्हणून मग मी गुलाबी साडी हे गाणं तयार केलं.
गुलाबी साडी या गाण्यामुळे संजूला जगभरात प्रसिद्धी मिळाली. याआधी हे गाणं कसं लिहिलं याबाबत देखील संजूने भाष्य केलं होतं. संजू हा मुळचा जळगावचा राहणारा आहे. जसा प्रत्येकाचा प्रवास असतो, तसाच माझाही प्रवास असल्याचं यावेळी संजूने म्हटलं. तसेच इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारा संजूला संगीताचं बाळकडू हे घरातूनच मिळालं असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे.
View this post on Instagram