एक्स्प्लोर

'तेव्हाही तुम्ही पुरावा मागणार का?' विद्यापीठात काम करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मासिक पाळीचा पुरावा मागताच सुप्रीम कोर्टाचा संतप्त सवाल

26 ऑक्टोबरला हरियाणातील रोहतक येथील MDU मध्ये चार महिला कर्मचारी यांच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना पाळी सुरू आहे का हे पाहण्यासाठी कपडे काढायला लावले होते.

हरियाणामधील महर्षी दयानंद विद्यापीठात (MDU) काम करणाऱ्या चार महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक पाळीचा पुरावा मागितल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात केंद्र सरकार, हरियाणा सरकार आणि इतर संबंधितांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी सांगितले की, हा प्रकार समाजाच्या महिलांकडे पाहण्याच्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो. त्या म्हणाल्या, “महिला पाळीमुळे कामावर येऊ शकल्या नाहीत, तर इतरांना काम देऊ शकत होते. काही राज्यांमध्ये तर मासिक पाळीसाठी सुट्टीही दिली जाते. मग त्या सुट्टीसाठीही पुरावा मागणार का?” सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील विकास सिंह यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगितले. त्यांनी केंद्र आणि हरियाणा सरकारने उच्चस्तरीय तपास करावा अशी मागणी केली.

सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वांची मागणी

याचिकेमध्ये सरकारने महिलांच्या आरोग्य, सन्मान, गोपनीयता आणि शरीरस्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, अशी मागणी आहे. हा केस पुन्हा 15 डिसेंबरला सुनावणीस येणार आहे.

MDU मध्ये काय घडले?

26 ऑक्टोबरला हरियाणातील रोहतक येथील MDU मध्ये चार महिला कर्मचारी यांच्या कपड्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना पाळी सुरू आहे का हे पाहण्यासाठी कपडे काढायला लावले आणि त्यांच्या सॅनिटरी पॅडचे फोटो काढून पाहणी करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित सुपरवायझरला निलंबित करण्यात आले. PGIMS पोलिस ठाण्याचे SHO यांनी सांगितले की, या प्रकरणात 31 ऑक्टोबरला FIR दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपींवर महिलांचा छळ, धमकी, मारहाण, आणि सन्मानाला धक्का देण्याचे आरोप आहेत. तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदाही लागू होऊ शकतो. विद्यापीठानेही स्वतःची चौकशी सुरू केली आहे आणि दोन सुपरवायझरला निलंबित केले आहे.

यापूर्वीही असेच प्रकार घडले

  • याचिकेमध्ये याआधी घडलेल्या घटनांचा उल्लेख आहे. 
  • उत्तर प्रदेश (2017) : 70 मुलींना पाळी तपासण्यासाठी कपडे काढायला लावले होते.
  • गुजरात (2020) आणि महाराष्ट्र (2025) : विद्यार्थिनींना अपमानित करत कपडे काढायला लावून पाळीचा पुरावा मागितला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget