एक्स्प्लोर

Munawar Faruqui : कॉमेडियन मुनव्वरचा शो वादाच्या भोवऱ्यात; भाजपकडून धमकी, कार्यक्रम झाला तर...

20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये मुनव्वरचा (Munawar Faruqui) स्टँडअप कॉमेडी शो होणार आहे.

Munawar Faruqui : प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. त्याच्या स्टँडअप कॉमेडिचा शो आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भाजपच्या एका नेत्यांकडून तेलंगना सरकारकडे आणि पोलिसांकडे मुनव्वरचा शो रद्द करण्याचे अवाहन करण्यात आलं आहे. 20 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये मुनव्वरचा हा स्टँडअप कॉमेडी शो होणार आहे. हा शो साईबराबामधील HICC कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला.   

याआधी देखील मुनव्वरचा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता 20 तारखेला होणाऱ्या मुनव्वरच्या कार्यक्रमाला रद्द करण्याचे आवाहन भाजपचे नेते  टी राजा सिंह यांनी  तेलंगना सरकारकडे आणि पोलिसांकडे केलं आहे. त्यांच्या मते, मुनव्वरच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. टी राजा सिंह यांनी यांनी सांगितलं आहे की, 'जर मुनव्वरचा कार्यक्रम झाला तर आम्ही तिथे जाऊन त्याला मारु. कार्यक्रमाचे तिकीट आमचे कार्यकर्ते विकत घेतली आणि पुढे काय होईल ते तुम्हाला माहित आहे.'

बीजेवायएम नेते नितीन नंदकर यांनी मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाला विरोध करत तेलंगणा डीजीपीला अर्ज दिला आहे. ते म्हणाले की, 'धर्माविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या वादग्रस्त व्यक्तीला मी सोडणार नाही. जानेवारीच्या सुरुवातीला त्याचा शो हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्री केटीआर यांनी मुनव्वरचे स्वागत केले. त्याला सर्व मदत आणि संरक्षणाचे आश्वासन देण्यात आले होते.  पण त्याचा शो रद्द करण्यात आला.' 

मुस्लिम अॅक्टिव्हिस्टनं केलं कार्यक्रमाचं स्वागत 
मुस्लिम अॅक्टिव्हिस्ट कसफ यांनी या कार्यक्रमाचे स्वागत केलं आहे. कसफ यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'आम्ही हैदराबादमध्ये आमचा भाऊ मुनव्वर याचं स्वागत करतो. शांतता, प्रेम आणि विविधतेचे शहर असलेल्या हैदराबादमध्ये त्यांना प्रेम आणि आदर मिळेल असं आश्वासन आम्ही त्यांना देतो. '

लॉक-अप या शोमुळे मुनव्वरला विशेष लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. 70 दिवस मुनव्वर हा लॉक अप कार्यक्रमामध्ये होता.हा कार्यक्रम जिंकल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफी व्यतिरिक्त, मुनव्वरला 20 लाख रुपयांचे रोख पारितोषिक, एर्टिगा गाडी आणि इटलीच्या सहलीवर जाण्याची संधी देखील मिळाली आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget