एक्स्प्लोर

लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन... मेट्रो झाली 'कमाईची मशीन'! लोकार्पणानंतर लाईन 2B वर शूटिंगमधून किती कमाई?

मुंबई मेट्रोच्या या नव्या प्रयोगामुळे भविष्यात मेट्रो नेटवर्क केवळ प्रवासाचं साधन न राहता ‘कमाई आणि क्रिएटिव्हिटीचं केंद्र’ बनण्याची चिन्हं दिसत आहेत.

Mumbai Metro Film Shooting:मुंबई मेट्रो आता केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता ‘कमाईचं नवं साधन’ बनू लागली आहे. MMRDAने मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक जाहिरात चित्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे. या उपक्रमातून तब्बल ₹20.35 लाखांचा (GST सहित) महसूल मिळाल्याने मेट्रो व्यवस्थेच्या आर्थिक मॉडेलला नवी दिशा मिळाली आहे. मुंबईच्या मेट्रो व्यवस्थेच्या उत्क्रांतीतील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

स्टेशन ते ट्रेन… सर्वत्र ‘लाइट, कॅमेरा, अॅक्शन!’

हे चित्रीकरण मंडाले मेट्रो स्थानक आणि धावत्या मेट्रो रेल्वेमध्ये करण्यात आलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ‘प्रिमायसेस हायरिंग पॉलिसी’ अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे मेट्रोची पायाभूत सुविधा केवळ प्रवासी सेवेसाठीच नव्हे, तर व्यावसायिक वापरासाठीही खुली होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नॉन-फेअर महसुलात वाढ

MMRDA चा फोकस आता ‘नॉन-फेअर बॉक्स रेव्हेन्यू’ (NFBR) वाढवण्यावर आहे. म्हणजेच तिकीटाशिवाय इतर स्रोतांमधून उत्पन्न वाढवणं. या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

2024–25 : ₹20.41 लाख
2025–26 : ₹25.96 लाख
2026–27 (सुरू) : ₹20.35 लाख

याशिवाय जाहिराती, टेलिकॉम सेवा, EV चार्जिंग, किऑस्क्स, ब्रँडिंग हक्क आणि चित्रीकरण यांसारख्या माध्यमांतूनही महसूल वाढवला जात आहे. मागील वर्षात NFBR मधून सुमारे ₹81 कोटींची कमाई झाली आहे.

मेट्रो बनतेय ‘क्रिएटिव्ह हब’

महा मुंबई मेट्रोने निर्माते, चित्रपट दिग्दर्शक आणि कंटेंट निर्मात्यांना मेट्रोच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी खुले आमंत्रण दिले आहे. सुस्पष्ट धोरणे आणि सुलभ मंजुरी प्रक्रिया यामुळे अशा उपक्रमांची अंमलबजावणी जलद आणि सुसंगतपणे होणार असून, प्रवासी सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. हा उपक्रम एमएमआरडीएच्या भविष्याभिमुख, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि बहुउद्देशीय मेट्रो व्यवस्थेच्या दृष्टीकोनाला अधोरेखित करतो.जिथे पायाभूत सुविधा केवळ प्रवास सुलभ करत नाहीत, तर नवोन्मेषी महसूल स्रोतांद्वारे मूल्यनिर्मिती करत ‘अधिक सक्षम आणि एकात्मिक मुंबई महानगर प्रदेशा’च्या उभारणीला चालना देतात.

MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं की, मेट्रो पायाभूत सुविधा बहुआयामी मालमत्ता म्हणून विकसित करण्यावर भर आहे. तिकीटाव्यतिरिक्त महसूल वाढवून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि परवडणारी सेवा देण्याचा उद्देश आहे.मुंबई मेट्रोच्या या नव्या प्रयोगामुळे भविष्यात मेट्रो नेटवर्क केवळ प्रवासाचं साधन न राहता ‘कमाई आणि क्रिएटिव्हिटीचं केंद्र’ बनण्याची चिन्हं दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget