एक्स्प्लोर

Mukul Dev Passed Away: प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 54व्या वर्षी निधन, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टवर शोककळा

Mukul Dev Passed Away: अभिनेता मुकुल देव याचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं असून गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

Mukul Dev Passed Away: 'सन ऑफ सरदार', 'आर... राजकुमार', 'जय हो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुल देव यांचं वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुकुल देव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. तसेच, तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवनं अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन सीरिअल्समध्येही काम केलं आहे. त्याच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मुकुलला चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

1996 मध्ये टेलिव्हिजन शोमधून इंडस्ट्रीत डेब्यू 

मुकुल देव यांचा जन्म 17 सप्टेंबर 1970 रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी 1996 मध्ये 'मुमकिन' या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर, टीव्ही व्यतिरिक्त, त्यांनी हिंदी तसेच पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलगू भाषेतील 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

मुकुल देव शेवटचा 'अँट द एंड' या हिंदी चित्रपटात दिसलेला. तो अभिनेता राहुल देवचा भाऊ होता. मुकुल देवचा जन्म नवी दिल्ली येथे जालंधरजवळील एका गावात पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरी देव हे असिस्टंट कमिश्नर ऑफ पोलीस होते. 

शेवटी 2022 मध्ये पडद्यावर झळकलेला मुकुल देव 

अभिनेता मुकुल देव 2022 मध्ये 'अँट द एंड' या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसला होता. टीव्हीवर तो 2018 मध्ये आलेल्या '21 सरफरोश' या सीरिजमध्ये गुल बादशाहच्या भूमिकेत दिसला होता. तर 2020 मध्ये तो ओटीटीवरील 'स्टेट ऑफ सीज: 26/11' या वेब सिरीजमध्ये दिसला होता.

दीपशिखा नागपालनं निधनाचं वृत्त केलं कन्फर्म 

मुकुल देव यांची जवळची मैत्रीण दीपशिखा नागपालनं सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मुकुल देव सोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिनं लिहिलंय, 'RIP'. तसेच, अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीनं चाहते आणि अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे.                                

मुकुल देवचा सिनेसृष्टीशी पहिला संबंध तो आठवीत असताना आला. त्यावेळी त्याला आठवीच्या वर्गात पहिला पगार मिळाला. दूरदर्शननं आयोजित केलेल्या एका नृत्य कार्यक्रमात त्यानं मायकल जॅक्सनची नक्कल केलेली. ते इंदिरा गांधी राष्ट्रीय विमान वाहतूक अकादमीचे ट्रेंड पायलट देखील होता.

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget