Mrinal Kulkarni Mother Death : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक, ज्येष्ठ मराठी लेखिका वीणा देव यांचे निधन
Mrinal Kulkarni Mother Death : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री आणि जेष्ठ मराठी लेखिका वीणाताई देव यांच्या निधनाची बातमी सध्या समोर येत आहे.
![Mrinal Kulkarni Mother Death : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक, ज्येष्ठ मराठी लेखिका वीणा देव यांचे निधन Mrinal Kulkarni Marathi actress mother Famour writer Veena Dev passed away at the age of 76 Mrinal Kulkarni Mother Death : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक, ज्येष्ठ मराठी लेखिका वीणा देव यांचे निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/29/cdcd8533a8b3b755b260af4716b5455e1730209883528720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mrinal Kulkarni Mother Death : जेष्ठ मराठी लेखिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांच्या मातोश्री वीणा देव यांचे दु:खद निधन झाले आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी वीणा देव (Veena Dev) यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी "मानसी" सहकारनगर येथे आणण्यात आले. वयाच्या 76 वर्षी वीणाताईंनी अखेरचा श्वास घेतला. मृणाल यांच्या मागे दोन कन्या मृणाल आणि मधुरा, जावई, नातू, नातसून असा परिवास आहे. मागील वर्षीच त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता.
वीणा देव यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रावर छाया पसरली आहे.ज्येष्ठ साहित्यिक आणि गो.नी.दांडेकर यांच्या त्या कन्या होत्या. वीणा देव यांच्या साहित्याचं साहित्यप्रेमींकडून कायमच कौतुक केलं जातं. इतकच नव्हे तर त्यांनी सुमारे 32 वर्षे अध्यापनाचं काम केलं. वीणा देव यांचे प्राध्यापक विजय देव यांच्यासोबत लग्न झाले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे म्हणून डॉ. विजय प्रल्हाद देव यांनी काम केले होते.
वीणा देव यांचा प्रवास...
डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या.पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केलं. तिथेच त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
वीणा देव यांचे साहित्य
'कधीकधी', 'परतोनी पाहे', 'स्त्रीरंग', 'विभ्रम', 'स्वान्सीचे दिवस' हे त्यांचे लेखनसाहित्य प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे 'स्मरणे गोनिदांची' हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं आहेत. तसेच त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या 'आशक मस्त फकीर' या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला.
साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. 1975 पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे 650 हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)