एक्स्प्लोर

सायकलवर आजारी वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर चित्रपट

15 वर्षीय ज्योती कुमारीनं (Jyoti Kumari) आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला होता. यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. तिच्या या प्रवासावर आता चित्रपट येणार आहे.

मुंबई : फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर देशानं पाहिलं ते कोरोनाच्या काळात. लॉकडाऊनमुळे शहरात जगणं मुश्कील झाल्यानंतर लाखो गोरगरीब मजुरांनी गावाचा रस्ता धरला. कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनानं. पण या स्थलांतराचा चेहरा बनली ती ज्योतिकुमारी पासवान. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून तिनं 1200 किलोमीटरचा प्रवास पार केला. गुरुग्राम ते दरभंगा या प्रवासात तिला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण आता याच ज्योतिकुमारीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. वुईमेक फिल्म्स या बॅनरनं ज्योतिकुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये या चित्रपटाचं काम सुरु होईल. ज्योतिकुमारी स्वत:च तिचं पात्र चित्रपटात वठवणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव आत्मनिर्भर असं असणार आहे. ज्योतीनं भोगलेलं दु:ख, तिचा प्रवास आणि काही कल्पनात्मक प्रसंगही या चित्रपटात असणार आहेत असं दिग्दर्शक कृष्णा यांनी सांगितलं. दिल्ली ते दरभंगा या ज्योतिच्या प्रवासाच्या मार्गावर विविध ठिकाणी या चित्रपटाचं चित्रिकरण होणार आहे. लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचं खूप कौतुक झालं होतं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इवांका ट्रंपनं देखील ट्वीट करत ज्योतीचं कौतुक केलं होतं. 15 वर्षीय ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला होता. याबाबत ट्वीट करताना इवांकानं म्हटलं होतं की, ''15 वर्षाची ज्योती कुमारी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून सात दिवसात 1,200 किमीचं अंतर पार करत गावी घेऊन गेली. सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेनं तिनं भारतीय लोकं आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं लक्ष वेधलं आहे." सायकलवर आजारी वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर चित्रपट ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक सर्वत्र झालं होतंच मात्र सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली होती. ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले होते. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचं ठरवलं आणि सात दिवसांत तिने 1200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं. ज्योतीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget