एक्स्प्लोर

Most Watched Webseries 2024: यंदा या टॉप 5 वेबसिरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, 'या' सिरिजचा पहिला नंबर!

या वर्षभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक वेबसिरिज ओटीटीवर रिलिज झाल्या. त्यापैकी सर्वाधिक चाललेल्या टॉप 5 वेबसिरिजला भरभरून प्रतिसाद मिळालाय.

Most Watched Webseries 2024: या वर्षी 2024 मध्ये अनेक वेब सिरीज रिलीज झाल्या. यापैकी मोजक्याच मालिका आहेत ज्यावर प्रेक्षकांनी मनमोकळेपणाने  प्रेमाचा वर्षाव केला. आता वर्षाचा शेवट आला तरी या वेबसिरिजचं नाव प्रेक्षकांच्या तोंडी आहे आणि या सिरिजचा ते आजही आनंद घेतायत. वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज झालेल्या या वेबसिरिज तुम्ही पाहिल्यात का?

1. पंचायत 3

 सचिव आणि प्राचार्यला ओळखत नाही असे बोटावर मोजण्याएवढेच काही असतील. पहिले दोन भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यानंतर यावर्षी या वेबसिरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ॲमेझॉन प्राईमची ही वेबसिरिज प्रेक्षकांनी तुफान पाहिली. यातले प्रधानजी, प्रल्हाद काका, सेक्रेटरीजी यांची धमाल, रिंकी आणि सेक्रेटरीची केमिस्ट्री आणि बनारकस आणि बिनोद यांची जुगलबंदी हीट ठरली. आतापर्यंत या वेबसिरिजला 28.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. जर तुम्ही या वेबसिरिजचा तिसरा सिझन पाहिला नसेल तर ॲमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

2. हिरामंडी

हीट वेबसिरिजच्या यादीत दुसरं नाव आहे बिब्बो जान, फरिदन आपा यांच्या हिरामंडी या वेबसिरिजची. संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी वेबसिरिज प्रेक्षकांनी फार मन लावून पाहिली. सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, शर्मीन सेगल, प्रतिभा रंता यांच्यासह अनेक स्टार्स या मालिकेत दिसले आहेत. त्याला नेटफ्लिक्सवर 20.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

3. इंडियन  पोलिस फोर्स सिजन 1

सिध्दार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टीची ॲक्शन असणारी इंडियन पोलिस फोर्स ही थ्रिलर वेबसिरिज यंदाच्या हीट वेबसिरिजपैकी एक आहे. या  वेबसिरिजला आतापर्यंत १९.५ मिलियन व्ह्यूज मिळालेत. 

4. कोटा फॅक्टरी 3

जितेंद्र कुमारची लोकप्रिय मालिका 'कोटा फॅक्टरी सीझन 3' तुम्हाला कोटा आणि तिथे शिकणाऱ्या मुलांचा संघर्ष दाखवते. या मालिकेचा तिसरा सीझन यावर्षी रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. याचे पहिले दोन भागही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. इंजिनिअरिंगसाठी आयआयटीत जाण्याचा विद्यार्थ्यांच्या संघर्षाला हात घालणाऱ्या या वेबसिरिजला तरुण प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर आत्तापर्यंत या मालिकेला नेटफ्लिक्सवर 15.7 मिलियन  व्ह्यूज मिळाले आहेत.

५. द लिजेंड ऑफ हनुमान सीझन 4

 डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलिज झालेली द लिजेंड ऑफ हनुमान सीझन 4 चे आतापर्यंत 5 सीझन आले आहेत. आणि सर्व सीझन प्रेक्षकांना खूप आवडले. या मालिकेच्या तिसऱ्या आणि सीझन 4 ला आतापर्यंत 14.8 व्ह्यू मिळाले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget