एक्स्प्लोर

Mohini Marathi Serial: शालिनीच्या लग्नात प्रतापरावाची एन्ट्री! ‘मोहिनी’ मालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा; समोर येणार धक्कादायक सत्य?

मोहिनी आपली भीष्मप्रतिज्ञा कशी पूर्ण करते आणि या संकटाचा सामना कसा करते, हे आगामी भागातच स्पष्ट होईल

Colors Marathi Serial:कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ मध्ये एक हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. शालिनी आणि महेंद्रच्या लग्नात आता एका मोठ्या विघ्नाची सावली पडणार असून प्रतापरावामुळे शालिनी आणि प्रतापरावांच्या नात्याचं संपूर्ण सत्य सर्वांसमोर उघड होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या मोहिनीच्या घरी लग्नाची लगबग सुरू असून थेट वेडिंग प्लॅनर आणि डेकोरेटर्सची एन्ट्री झाली आहे. मोहिनी संपूर्ण लग्नाचं प्लॅनिंग घरच्यांना समजावून सांगत आहे, तर दुसरीकडे RK ने बंटीला सोबत घेऊन या लग्नात एक मोठे 'महानाट्य' घडवण्याची पूर्ण तयारी केली आहे. पारूबाईने घरात आणलेला ज्योतिषी हे लग्न झाल्यास मोठा अनर्थ होईल अशी भविष्यवाणी करतो, पण मोहिनी मात्र कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या वेळी लग्न लावून देण्यावर ठाम आहे. पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या. ७:३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

‘मोहिनी’त हायव्होल्टेज ड्रामा

मालिकेत अनेक घटना घडत आहेत ज्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. कार्तिकीने नकळतपणे प्रतापरावांशी संपर्क साधला, ज्यामुळे शालींनी आणि घरचे प्रचंड चिडले. या प्रतापराव प्रकरणाची शालिनीला आधीपासूनच प्रचंड भीती वाटत होती. तेव्हा मोहिनीने शालिनीचे जुने मंगळसूत्र तोडून तिला त्या जोखडातून मुक्त केले आणि पुन्हा कधी सामना झाला तर प्रतापरावला शालिनीच्या पायावर डोके ठेवून नाक घासायला लावेन, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती. दुसरीकडे, RK ने मोहिनीच्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती काढून तिला आपल्या ऐश्वर्याच्या जोरावर दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. RK ने अत्यंत हुशारीने मोहिनीला साडेचार लाखांचे मंगळसूत्र खरेदी करायला फशी पाडले, जे मंगळसूत्र शालिनी RK ला परत करण्यासाठी त्याच्या घरी घेऊन जाते. आता या संपूर्ण कथानकात एक अत्यंत रंजक वळण आले आहे, कारण RK पडद्यामागून मोहिनीचा स्वाभिमान दुखावण्यासाठी या लग्नात सतत अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. दुसरीकडे, महेंद्र शालिनीसाठी स्वतः नवीन मंगळसूत्र घेऊन येणार. शालिनीच्या हातावर मेहंदी रंगू लागते. पण ही मेहंदी पाहत असतानाच शालिनीला तिच्या भूतकाळातील आठवण येते. RK आणि मोहिनीचे दुकानातील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आधीच गोंधळ उडालेला असताना, मुकुंद देखील या लग्नात मोहिनीला मागणी घालण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे या संपूर्ण लग्नसोहळ्यात अजून एक मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

शालिनी -महेंद्रच्या आयुष्यात मोठे वादळ येणार 

पुढील भागांमध्ये, लग्नाची मेहंदी रंगत असतानाच प्रतापराव आता मुंबईच्या दिशेने निघाल्यामुळे शालिनी आणि महेंद्रच्या आयुष्यात मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. RK चे छुपे कटकारस्थान आणि प्रतापरावांची अचानक होणारी एन्ट्री यामुळे शालिनी आणि महेंद्रचे हे लग्न सुखरूप पार पडणार की यात काही नवीन विघ्न येणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी कमालीचे उत्कंठावर्धक ठरणार आहे. मोहिनी आपली भीष्मप्रतिज्ञा कशी पूर्ण करते आणि या संकटाचा सामना कसा करते, हे आगामी भागातच स्पष्ट होईल. पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या. ७:३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Embed widget