एक्स्प्लोर

Mohammed Rafi : जगाचा निरोप घेण्याआधी मोहम्मद रफींनी 'हे' गाणं केलं होतं रेकॉर्ड ; वयाच्या 13 व्या वर्षी केला पहिला परफॉर्मन्स

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मोहम्मद रफी (Mohammed Rafi) या आवाजाच्या 'जादूगार' चा जीवनप्रवास...

Mohammed Rafi : बॉलिवूडमधील एव्हरग्रीन गाणी गाणारे मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांचा आज स्मृतीदिन.  मोहम्मद रफींची गाणी आजही लोक आवडीनं ऐकतात. आपल्या सुरेल आवाजाने  मोहम्मद रफींनी अनेकांची मनं जिंकली. सध्याची तरुण पिढी देखील मोहम्मद रफींची गाणी आवडीनं ऐकते. एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या आवाजाच्या 'जादूगार' चा जीवनप्रवास अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात मोहम्मद रफी यांच्याबद्दल...

रस्त्यावर फिरणाऱ्या फकीरचं गाणं ऐकून प्रभावित झाले 

मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील कोटला सुल्तान सिंह गावात झाला. मोहम्मद रफी यांना सहा भावंडे होती.  मोहम्मद रफी यांचे बालपणी 'फिको' हे टोपणनाव होते. रस्त्यावर फिरणाऱ्या फकीराला गाताना पाहून मोहम्मद रफी प्रभावित झाले होते. त्या फकीरचं गाणं ऐकून त्यांनी देखील गाणी गायला सुरुवात केली.  

मोहम्मद रफी हे नऊ वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब पंजाबसोडून लाहोरमध्ये स्थायिक झाले. बालपणी मोहम्मद रफी यांना शिक्षणाची आवड नव्हती. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना दुकानात काम करण्यास सांगितलं. लाहोरमध्ये उस्ताद वाहिद खान यांच्याकडून रफींनी संगीताचे धडे गिरवले. त्यानंतर गुलाम अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. 

वायाच्या 13 व्या वर्षी केला पहिला परफॉर्मन्स
1937 मध्ये एका कार्यक्रमात लाईट गेल्यानं प्रसिद्ध गायकर कुंदनलाल सहगल यांनी गाणं गाण्यास नकार दिला. त्यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी मोहम्मद रफी यांना या कार्यक्रमामध्ये परफॉर्म करण्याची संधी दिली. वयाच्या 13 व्या वर्षी रफींनी स्टेजवर पहिल्यांदा गाणं गायलं. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कुंदनलाल सहगल यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मोहम्मद रफी हे खूप मोठे गायक होती. काही वर्षांनी  कुंदनलाल यांचे हे बोलणे खरे झाले. अभिनेते आणि निर्माते  नजीर मोहम्मद यांनी मेहम्मद रफी यांना मुंबईमध्ये बोलावले. 'हिन्दुस्तान के हम है' हे गाणं तेव्हा मोहम्मद रफी यांनी गायलं. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

जगाचा निरोप घेण्याआधी 'हे' गाणं केलं रेकॉर्ड

बैजू बावरा या चित्रपटातील गाण्यांमुळे मोहम्मद रफी यांना विशेष लोकप्रियता मिळाली. 30 जुलै 1980 रोजी 'जिस रात के ख्वाब आए, वो रात आई' हे गाणं गायलं. हे मोहम्मद रफी यांचे शेवटचे गाणं होते. 31 जुलै 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मोहम्मद रफी यांचे निधन झाले. संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. त्यांची गाणी ही अजरामर राहितील. 

हेही वाचा: 

Mohammed Rafi Birth Anniversary : आवाजाचे 'जादूगार' मोहम्मद रफी; 13 व्या वर्षी पहिलं गाणं ते गायकीचा 'बादशाह' 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कारRatan Tata Last Rites : रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी , सुशीलकुमार शिंदेंची हजेरीRatan Tata Last Rites : रतन टाटांना अखेरचा निरोप, मुंबई पोलिसांकडून सलामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्या रतन टाटांच्या 26 कंपन्या कोणत्या? सविस्तर यादी एका क्लिकवर
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
Embed widget