(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Upcoming Web Series Movies: अॅक्शन, ड्रामा आणि थ्रीलची मेजवानी ; या वीकेंडला पाहा वेब सीरिज आणि चित्रपट
या वीकेंडला हे चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web Series) तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
Web Series , Movie : ओटीटीवरील वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि चित्रपट लोक आवडीने पाहतात. या वीकेंडला हे चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता.
मिथ्या (Mithya)
हुमा कुरेश (Huma Qureshi) आणि अवंतिका दसानी यांची प्रमुख भूमिका असलेली मिथ्या ही सीरिज 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहून अनेक जण या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात होते.
View this post on Instagram
बेस्टसेलर (Bestseller)
बेस्टसेलर या सीरिजमध्ये श्रुती हसन, मिथुन चक्रवर्ती सत्यजीत दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. अॅक्शन, ड्रामा आणि थ्रील हे सर्व तुम्हाला या वेब सीरिजमध्ये पाहता येणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.
'अ थर्स डे' (A thursday)
'अ थर्स डे' हा चित्रपट Disney प्लस Hotstar या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. रॉनी स्क्रूवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात यामीसोबतच डिंपल कपाडिया, नेहा धूपिया, अतुल कुलकर्णी, माया सराओ आणि करणवीर शर्मा हे कालाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. टीझर पाहून आता प्रेक्षक या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
होमकमिंग (Homecoming)
18 फेब्रुवारी रोजी होमकमिंग ही सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये शायोनी गुप्ता, प्लाबिता बोरठाकुर, सोहम मजूमदार आणि हुसैन दलाल हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
हेही वाचा :
Salman Khan : सलमान एका महिन्यात कमावतो कोट्यवधी ; एकूण संपत्ती माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha