VIDEO : दोन्ही बाजूंनी ट्रक आले पण Mithun Chakraborty ने हाताने अडवले, कोणत्या सिनेमातील आहे 'हा' सीन?
Mithun Chakraborty : दोन्ही बाजूंनी ट्रक आल्या पण Mithun Chakraborty ने हाताने अडवले, माघारी लावल्या; कोणत्या सिनेमातील आहे 'हा' सीन?

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार्सपैकी एक म्हणून ओळखले जातात. 80 च्या दशकात ते सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या फ्लॉप चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. विशेष म्हणजे, फक्त चार वर्षांत त्यांचे तब्बल 50 चित्रपटांची रिलीज झाले. मात्र सर्वच चित्रपट जवळपास हिट पासून लांबच राहिले. मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली मृगया या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1982 मध्ये त्यांनी डिस्को डान्सर या सुपरहिट चित्रपटात काम केलं, ज्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर मिथुन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. दरम्यान, त्यांनी बऱ्याच चित्रपटात त्यांनी चमत्कारीक सीन केले होते. ज्यामध्ये कधी ते सायकलच्या आडून गोळ्या झाडताना दिसतात. तर कधी अॅक्शन सीनमध्ये एकटे कित्येक लोकांना भिडताना दिसायचे. दरम्यान, सध्या त्यांच्या Billa No 786 सिनेमातील एक सीन सध्या व्हायरल होत आहे. या सीनमध्ये ते दोन्ही बाजूंनी ट्रक आलेले ट्रक त्यांच्या दोन्ही हातांनी अडवताना दिसत आहेत. नेटकऱ्यांनी या सीनवरुन त्यांना ट्रोल देखील केलं. मात्र, त्याकाळी असे सीन लोकप्रिय देखील होत होते.
दोन्ही बाजूंनी ट्रक आले पण Mithun Chakraborty ने हाताने अडवले
‘डिस्को डान्सर’ स्टार मिथुन चक्रवर्तींचे 1997 ते 2000 या काळात 50 चित्रपट रिलीज झाले होते. मात्र या पैकी केवळ दोनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून राहिले. बाकीचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले तरी त्यांनी केलेली कमाई स्वतःमध्ये विक्रम ठरली. मिडिया रिपोर्टनुसार, 1997 मध्ये मिथुन यांनी 8 चित्रपट केले, 1998 मध्ये 17, 1999 मध्ये 14 तर 2000 मध्ये 11 चित्रपट रिलीज झाले. पण यापैकी फक्त दोन चित्रपट सेमी-हिट ठरले – शपथ (1997) आणि चंडाल (1999). या 50 चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर 71.12 कोटी रुपयांची कमाई केली होती.
मिथुन यांच्या सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी शपथ (1997) हा होता, ज्याने तब्बल 4.95 कोटी रुपयांची कमाई केली. तर लोहा ने 2.3 कोटी, कालिया ने 2.74 कोटी आणि दादागिरी ने 2.66 कोटींचं बिझनेस केलं.
1998 मध्ये मिथुन यांचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला चंडाल, ज्याने 3.59 कोटींची कमाई केली. त्याशिवाय शेर-ए-हिंदुस्तान ने 3.18 कोटी, गुंडा ने 2.14 कोटी, मिलिटरी राज ने 2.56 कोटी आणि यमराज ने 2.84 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं.
1999 मध्ये आलेला त्यांचा शेरा हा सर्वाधिक कमाई करणारा पण अपेक्षाभंग करणारा चित्रपट ठरला, ज्याने 2.62 कोटी रुपये कमावले. गंगा की कसम आणि आग ही आग हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.
2000 साली ज्वालामुखी, बिल्ला नंबर 786, आज का रावण आणि दादा यांसारखे चित्रपट फारसा गाजले नाहीत. त्याच वर्षी मिथुन यांचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला सुलतान, ज्याने 1.38 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपासही नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते कोट्यावधी























