(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mithila Palkar : मराठमोळी मिथिला पालकर दाखवणार आता तामिळ सिनेसृष्टीत जलवा; 'या' चित्रपटात झळकणार
Mithila Palkar : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकर आता बॉलिवूडनंतर आता तामिळ चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
Mithila Palkar Latest Updates : अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) आता बॉलिवूडनंतर (Bollywood) आता तामिळ चित्रपटांमध्ये (Tamil Movie) झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. यावेळी मिथिला चित्रपटाच्या टीम सोबत उपस्थित होती. ‘ओहो एन्थान बेबी' ( Oho Enthan Baby) या तामिळ चित्रपटातून मिथिला तामिळ सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे.
तामिळ चित्रपटातील पदार्पणाबद्दल बोलताना मिथिला म्हणाली की, “मला साउथमध्ये काम करायला खूप आवडते, तेलुगू सिनेमातील माझा अनुभव अप्रतिम आहे. आता ‘ओहो एन्थान बेबी’ मधून मी तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. मिथिलाने पुढे म्हटले की, तामिळ चित्रपटात काम करत असताना आनंद, उत्साह असून दुसरीकडे काहीसं दडपण वाटत आहे. मी आता या चित्रपटाबद्दल फार काही सांगू शकत नाही, पण प्रेक्षकांना फार काळ प्रतीक्षा करायला लावू शकत नाही असेही मिथिला पालकरने म्हटले.
‘ओहो एन्थान बेबी’ चे दिग्दर्शन कृष्णकुमार रामकुमार करत आहेत. रोमियो पिक्चर्स, विष्णू विशाल आणि डी कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाचे संगीत दरबुका सिवा यांनी दिले आहे. यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली होती.
View this post on Instagram
मिथिला पालकरने 'गर्ल इन द सिटी' आणि नेटफ्लिक्सच्या 'लिटिल थिंग्ज'या सीरिजमध्ये काम केले आहे. पालकरने 2015 मध्ये मराठी भाषेतील माझं हनीमून या लघुपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.निखिल आडवाणी यांचा कट्टीबट्टी हा मिथिलाचा पहिला चित्रपट होता. त्याशिवाय, 2018 मध्ये आलेल्या कारवाँ या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. 2017 मधील मुरांबा या मराठी चित्रपटात तिने काम केले. मिथिलाला तिच्या अभिनयासाठी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
View this post on Instagram