Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले....
Bill Gates Resume : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी नुकताच त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा बायोडाटा अर्थात रेझ्युमे शेअर केला आहे.
Bill Gates Resume : कोणतीही नोकरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला रेझ्युमे. रेझ्युमे हे आपल्या करिअरच्या दिशेने पहिले पाऊल आहे. रेझ्युमेमध्ये आपली शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती आणि इतर कौशल्यांची माहिती लिहिलेली असते. आपल्या प्रत्येकाकडे स्वतःचा रेझ्युमे असतोच. पण, तुम्ही कधी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचा रेझ्युमे पहिला आहे का? मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी नुकताच त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा बायोडाटा अर्थात रेझ्युमे शेअर केला आहे. आपल्या रेझ्युमेपेक्षा आजच्या पिढीचा रेझ्युमे खूपच चांगला आहे याची मला खात्री आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
बिल गेट्स यांनी शेअर केलेला हा रेझ्युमे 1974सालातील आहे. गेट्स यांनी शेअर केलेल्या या बायोडाटामध्ये त्यांचे नाव 'विल्यम एच गेट्स' असे लिहिलेले आहे. बिल गेट्स याचा हा रेझ्युमे तेव्हाचा आहे, जेव्हा ते हार्वर्ड कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होते. रेझ्युमेमध्ये नमूद केलेल्या तपशिलानुसार, बिल गेट्स यांनी डेटाबेस मॅनेजमेंट, ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, कंपायलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स यासह विविध अभ्यासक्रम पूर्ण केले होते.
पाहा पोस्ट:
त्यांना फोरट्रान, कोबोल, अल्गोल, बेसिक इत्यादी सर्व प्रमुख प्रोग्रामिंग भाषांचा अनुभव आहे. यात त्यांनी 1973मध्ये TRW सिस्टम्स ग्रुपमध्ये सिस्टम प्रोग्रामर म्हणून त्यांच्या कामाच्या अनुभवाचा उल्लेख केला आहे. बिल गेट्स यांनी 1972 मध्ये लेकसाईड स्कूल, सिएटल येथे को-लीडर आणि सह-भागीदार म्हणून काम पाहिल्याची माहितीही यात मनुद केली आहे.
कॅप्शनमध्ये लिहिली खास गोष्ट....
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, गेट्स हे जगभरातील तरुणांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत. त्यांच्या तब्बल पाच दशकांच्या जुन्या रेझ्युमीनेही सोशल मीडियावर चांगलीच वाहवा मिळवली आहे. हा रेझ्युमे शेअर करताना बिल गेट्स म्हणाले की, माझ्या रेझ्युमेपेक्षा आजच्या पिढीचा रेझ्युमे खूपच चांगला आहे, याची मला खात्री आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यावेळच्या आणि आताच्या स्वरूपामध्ये बरीच समानता असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा :
Bill Gates : आयफोन, वन प्लस.... मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स वापरतात कोणता स्मार्टफोन?
Mahesh Babu, Bill Gates : साऊथ सुपरस्टार महेश बाबूने घेतली बिल गेट्सची भेट! फोटो शेअर करत म्हणाला...