(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मुंबई : 'हॅरी पॉटर' (Harry Potter) या हॉलिवूड चित्रपटात अल्बस डंबलडोरची भूमिका साकारणारे अभिनेते मायकल गॅम्बन (Michael Gambon) यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांची पत्नी आणि मुलीने त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली. यामुळे त्यांच्या चाहत्यावर्गासह संपूर्ण हॉलीवूड (Hollywood) सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. वयाच्या 82 व्या वर्षी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त एकून त्यांच्या चाहत्यावर्गाला मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येत आहे.
Professor Albus Dumbledore (Sir Michael Gambon) has sadly passed away aged 82. The actor was best know for his role in JK Rowling’ Harry Potter in 6/8 movies.
— ᴼᴹᴳ ᶥᵗˢ Adàeze (@nubianbarbieeee) September 28, 2023
His career spanned 5 decades, winning 4 BAFTA awards.
He died in his sleep peacefully after suffering from pneumonia. pic.twitter.com/SLPFCUbPPJ
त्यांच्या पत्नीने काय म्हटलं?
क्लेअर डॉब्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर मायकेल गॅम्बन यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी लेडी गॅम्बन आणि मुलगा फर्गस यांनी दिली होती. त्यांच्या निधनाविषयी सांगताना त्यांच्या म्हटलं की, 'मायकल गॅम्बन यांच्या निधनाचं वृत्त देताने आम्हाला अतिशय दुःख होत आहे. ते एक प्रेमळ पती आणि वडिल होते.'
Sad to report that Michael Gambon, who played Albus Dumbledore in the last six Harry Potter films, has sadly passed away at the age of 82.
— Harry Potter Universe (@HPotterUniverse) September 28, 2023
Please raise your wands for Michael and all of his family and friends during this difficult time. May he rest in peace. pic.twitter.com/VYgaqaAVEY
निमोनियामुळे झाले मायकल यांचे निधन
दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीने पुढे बोलताना म्हटलं की, 'सर मायकल गॅम्बन यांना न्यूमोनियाची लागल झाली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांच्यावरील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर या कठिण काळात कुटुंबाला त्यांचा वेळ द्याल. तसेच तुमच्या समर्थनासाठी आणि प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे आभार.'
नाट्यक्षेत्रातही गॅम्बन यांचे कार्य
मायकल यांनी फक्त चित्रपटांमधूनच नाही तर नाटकांमधून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी पिंटर, बॅकेट आणि एक्बोर्न यांसारख्या नाटकांमधून काम केले आहे. परंतु त्यांची हॅरी पॉटर या चित्रपटामधील त्यांच्या अल्बस डंबलडोर यांच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वाधिक नावलौकिक मिळाला.
हेही वाचा :
Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!