Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!
Animal Teaser : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.
![Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट! Animal Teaser Out Ranbir Kapoor Looks Handsome Lethal Rashmika Mandana In Sandeep Reddy Vanga Film Bollywood Entertainment Ranbir Kapoor : रणबीरने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट; 'Animal'चा धमाकेदार टीझर आऊट!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/28/ee5f9ef4e3ed49ca0bbd5835d86a16e01695892228070254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ranbir Kapoor Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा या वर्षातला बहुचर्चित सिनेमा आहे. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे. रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाचा धमाकेदार टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
'अॅनिमल'चा धमाकेदार टीझर आऊट! (Animal Teaser Out)
'अॅनिमल' या सिनेमाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. टीझरच्या सुरुवातीलाच अनिल कपूर (Anil Kapoor) दिसत आहे. त्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये रश्मिका रणबीरला म्हणत आहे,"माझा बाबा हा जगातला सर्वोत्कृष्ट बाबा आहे". या टीझरमध्ये रणबीरचा इंटेंस लूक पाहायला मिळत आहे. टीझरच्या शेवटी बॉबी देओलची एन्ट्री होते. या टीझरमधील रणबीर कपूरचा लूक अंगावर शहारे आणणारा आहे.
View this post on Instagram
'अॅनिमल'च्या टीझरमध्ये रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. गँगस्टरच्या या नाट्यात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. वडिल-मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 'अॅनिमल' या सिनेमात अनिल कपूर हे रणबीर कपूरच्या वडिलांच्या तर रश्मिका मंदाना रणबीरच्या गर्लफ्रेंच्या भूमिकेत दिसणार आहे.
'अॅनिमल' कधी होणार रिलीज? (Animal Release Date)
'अॅनिमल' हा सिनेमा आधी ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हे सिनेमे ऑगस्टमध्ये प्रदर्शित होत असल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अॅनिमल'चा टीझर 2 मिनिट 56 सेकंदाचा आहे. अल्पावधीतच युट्यूबवर (Youtube) या टीझरला एक मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'अॅनिमल' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूरच्या या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'अॅनिमल'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना सिनेमाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या
Happy Birthday Ranbir Kapoor : 'रॉकस्टार' ते 'संजू'; IMDb वरील रणबीर कपूरच्या 'Top 10' सिनेमांबद्दल जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)