एक्स्प्लोर

Yek Number: थिएटरनंतर 'येक नंबर'चा टेलिव्हिजनवर धमाका; ZEE5 वर 'या' दिवशी वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर

‘येक नंबर’ या मराठी ब्लॉकबस्टरचा वर्ल्ड प्रीमिअर 8 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची ZEE5 तर्फे घोषणा करण्यात आली आहे.

Yek Number World Digital Premiere on Zee5: व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 वर 8 नोव्हेंबरपासून 'येक नंबर' अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर (World Digital Premiere) करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित चित्रपटात  धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट आणि सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून 'येक नंबर'मध्ये रोमान्स, नाट्य, राजकीय ट्विस्ट आणि टर्न्स यांची सांगड घातली आहे.

'येक नंबर'ची कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो गावातील एक उमदा आणि राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचं मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती आहे आणि त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. "तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.", अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप हे अशक्यकोटीतील आव्हान स्वीकारतो आणि अनपेक्षितपणे तो राज साहेबांशी संबंधित एका हत्येच्या कटात गोवला जातो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रतापला योग्य-अयोग्याच्या गढूळ पाण्यातून मार्ग काढावा लागतो आणि या प्रवासात धक्कादायक वळणांनी भरलेली एक थरारक कथा उलगडत जातं.

'येक नंबर' हे एक खिळवून ठेवणारे कथानक आहे आणि यात राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रेम आणि राजकारणाचं नाट्य गुंफलेले आहे. या चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हानं यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.

'येक नंबर' चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणाले, "येक नंबर' हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक प्रवास होता. या चित्रपटात प्रेम आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन भावना गुंफल्या आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5च्या माध्यमातून हा चित्रपट अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, याचा मला अत्यंत आनंद आहे.  या प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांना घरी बसून आमच्या चित्रपटाचा आनंद घेता येईल. 'येक नंबर'च्या डिजिटल प्रदर्शनासाठी मी अत्यंत उत्सुक आहे आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या आयुष्यातील प्रेम व विचारधारा यावर अर्थपूर्ण चर्चा घडेल."

'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या तेजस्विनी पंडित म्हणाल्या की, "आम्हाला ही प्रभावी कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ZEE5 सोबत भागीदारी करताना आनंद होत आहे. ‘येक नंबर’मध्ये लाखो प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची क्षमता आहे आणि इतके गुणवान कलाकार आणि राजेश मापुस्कर या दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता. या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन ही केवळ सुरुवात आहे. आम्ही पुढील प्रवासाबाबत आशावादी आहोत आणि ZEE5 च्या माध्यमातून ही अप्रतिम कथा अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत.

'येक नंबर' चित्रपटात प्रतापची व्यक्तिरेखा साकारणारे धैर्य घोलप म्हणाले की, "प्रताप ही व्यक्तिरेखा साकरण्याचा अनुभव अतुलनीय होता आणि प्रेक्षकांकडून या व्यक्तिरेखेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाने मी अत्यंत रोमांचित झालो आहे. प्रेम आणि महत्त्वाकांक्षेने प्रेरित असलेला प्रतापचा प्रवास आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी झगडणाऱ्या अनेकांचा संघर्ष अधोरेखित करतो. चित्रपटाचे प्रभावी कथानक, आमच्या प्रतिभावान कलाकारांचा उत्तम अभिनय आणि दिग्दर्शकांचे व्हिजन यामुळे प्रेक्षकांसाठी एक आगळीवेगळी अनुभूती तयार झाली आहे. ZEE5वर चित्रपटाचा प्रीमियर होत असताना, आमच्या चाहत्यांसोबत या प्रवासात पुढे जाण्यास मी उत्सुक आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफीVarsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special ReportNarayangad VS Bhagwangad : बीड प्रकरणी गडाच्या परंपरेला वादाचं आख्यान? Rajkiya Sholay Special ReportRahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Embed widget