एक्स्प्लोर

Marathi Movie : रंगणार 'भुताचा डाव', सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Marathi Movie : एक डाव भुताचा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Marathi Movie : स्मशानात जन्म झाल्यामुळे सतत भूत दिसणाऱ्या तरूण आणि मुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेलं भूत यांच्यातील धमाल गोष्ट 'एक डाव भुताचा' (Ek daav Bhutacha) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट ४ ऑक्टोबरला  प्रदर्शित होणार असून, चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 

रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने एक डाव भुताचा या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. सोशल मीडियावर सिनेमाच्या ट्रेलरला बरीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. 

सिनेमात 'हे' कलाकार दिसणार

चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी  वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांनी गाणी गायली आहेत. 

भुताला मिळणार का मुक्ती?

एक भूत मुक्ती मिळवण्यासाठी एका तरुणाच्या आयुष्यात येतं. मुक्ती मिळवून देण्याच्या बदल्यात त्या तरुणाचं प्रेम असलेली तरुणी त्याला मिळवून देण्याचा डाव तरुण आणि भूत यांच्यात ठरतो. त्यामुळे भूताला मुक्ती मिळते का? तरुणाला त्याचं प्रेम मिळतं का ? याची धमाल गोष्ट "एक डाव भूताचा" या चित्रपटात आहे. या गोष्टीला प्रेमकथा, विनोदाची रंजक फोडणीही असून अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात आहे. ही सर्व धमाल चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसत असल्यानं चित्रपटाविषयीची उत्सुकता निश्चितच वाढली आहे. मोठ्या पडद्यावर ही धमाल अनुभवण्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ultra Marathi (@ultramarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : शंभर दिवसांचा खेळ 70 दिवसांतच आटोपणार? सोशल मीडियावर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?Rajkiya Shole | Special Report | Shinde Vs Thackeray | पाहिले न मी तुला, मर्सिडीजचे भाव, टोमण्यांंचा घाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget