अंबानींच्या लग्नात फक्त दोन मराठी सिनेकलाकारांना निमंत्रण, पण त्यांनीही फिरवली पाठ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Anant-Radhika Wedding : अगदी हॉलीवूडसह संपूर्ण बॉलीवूडने ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली तो लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. पण या सोहळ्याला निमंत्रित करण्यात आलेल्या मराठी कलाकारांनी पाठ फिरवली.
Marathi Actors at Anant-Radhika Wedding : मुंबईत पार पडलेल्या राजेशाही सोहळ्याला संपूर्ण बॉलीवूड अगदी झाडून उपस्थित होतं. म्हणजे अगदी ऑरीपासून ते रजनीकांत, अमिताभ या दिग्गज मंडळींनी देखील अंबानींच्या (Ambani Family) सोहळ्याला उपस्थिती लावली. इकतच नव्हे तर मराठमोळ्या गायकांच्या तालावर वऱ्हाडी मंडळी थिरकलीही. पण यामध्ये मराठी सिनेसृष्टीतले कलाकार मात्र कुठेही दिसले नाहीत.
अंबानींच्या लग्नासाठी मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामध्ये अमृता खानविलकर आणि अभिनेता श्रेयस राजे यांचा समावेश होता. पण दोन्ही कलाकार मंडळी या गर्दीत कुठेच दिसली नाहीत. त्यामुळे ही मंडळी उपस्थितच नव्हती की पापाराझीच्या कॅमेऱ्यात टिपलीच गेली नाहीत, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
अमृता आणि श्रेयस गैरहजर?
श्रेयस आणि अमृता या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर अंबानींकडून आलेल्या निमंत्रण पत्रिकेचे फोटो शेअर केले होते. श्रेयसने हे फोटो शेअर करत अगदी आता लग्नाला जावं लागेल असं कॅप्शन दिलं होतं. तसेच अमृताने तिला आलेल्या निमंत्रण पत्रिकेचे फोटो शेअर केले होते. पण समोर आलेल्या कोणत्याही व्हिडीओ आणि फोटोमध्ये श्रेयस अमृता दिसले नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर सोहळ्याचे कोणतेही फोटो टाकले नाहीत.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान सोशल मीडियावर मराठी कलाकारांना निमंत्रण न मिळाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एकाने एक्स पोस्ट करत म्हटलं की,शाही विवाह सोहळ्यात मराठी कलाकारांना निमंत्रण असूनही त्यानं पाठ फिरवली किंवा ते प्याप्सच्या कॅमरातून कसे सुटले हा प्रश्न नक्की पडतो… त्यामुळे नक्की काय घडलंय, या प्रश्नाचं उत्तर सध्या अनेकजण शोधत आहेत.
शाही विवाह सोहळ्यात मराठी कलाकारांना
— Vinit Vaidya (@hifrom_vinit) July 14, 2024
निमंत्रण असूनही त्यानं पाठ फिरवली किंवा ते प्याप्सच्या कॅमरातून कसे सुटले हा प्रश्न नक्की पडतो…
अंबानींच्या सोहळ्याला मराठमोळा साज
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. पण या लग्नातील मराठमोळ्या साजने विशेष लक्ष वेधून घेतलं. गायक अजय-अतुल यांच्या गाण्याने अनंतचा लग्नमंडप दुमदुमला. त्याचप्रमाणे संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावरही वऱ्हाडी मंडळी थिरकताना पाहायला मिळाली.