Marathi Actress Post On Lalbaugcha Raja Visarjan 2025: 'गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा...'; मराठी अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Marathi Actress Post On Lalbaugcha Raja Visarjan 2025: विसर्जनासाठी राजाचा अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेला तराफाही तयार होता. पण, ओहोटीची वेळ चुकली आणि राजाचं विसर्जन रखडलं.

Marathi Actress Post On Lalbaugcha Raja Visarjan 2025: नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला मुंबईतील 'लालबागचा राजा'ला यंदा विसर्जनासाठी ताटकळत समुद्राच्या लाटांमध्येच राहावं लागलं. संपूर्ण जगाला लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? कधी होणार? याची हुरहुर लागलेली. दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'लालबागचा राजा'ची मिरवणूक शाही थाटात सुरू झाली. आपल्या लालबाग नगरीचा निरोप घेऊन 'लालबागचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. विसर्जनाच्या मार्गात ठिकठिकाणी 'लालबागचा राजा'चं शाही थाटात स्वागत झालं, अनेक भक्तांनी साश्रू नयनांनी राजाला निरोप दिला आणि त्यासोबतच पुढच्या वर्षी लवकर येण्याचीही साद घातली. सर्वांचा निरोप स्विकारत राजाची विसर्जनाची शाही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचली. विसर्जनासाठी राजाचा अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेला तराफाही तयार होता. पण, ओहोटीची वेळ चुकली आणि राजाचं विसर्जन रखडलं. विसर्जनाचा तराफा एकीकडे आणि 'लालबागचा राजा'ची मुर्ती सुमुद्राच्या लाटांवर भलतीकडेच हेलकावे खात होती. अखेर राजाला तराफ्यावर चढवता चढवता संध्याकाळ लोटली आणि विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून तब्बल 33 तासांनी 'लालबागचा राजा'चं विसर्जन झालं.
लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) तब्बल 33 तासांनंतर विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आला. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला. पण, सोशल मीडियावर मात्र, वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राजाच्या विसर्जनासाठी यंदा गुजरातहून नवा तराफा आणला होता. नेटकऱ्यांनी मात्र नेमकं हेच हेरलं आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. 'लालबागचा राजा'ची मूर्ती विसर्जनावेळी समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात होती, त्यावेळी कोळी बांधवांनी पाण्यात उतरुन मूर्ती धरून ठेवलेली. नेटकऱ्यांनी नेमकं हेच हेरलं आणि 'लालबागचा राजा'नं अखेर कोळी बांधवांनाच जवळ केलं, अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या.

"गुजरातवरुन विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा..."
अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अशातच मराठमोळी अभिनेत्री आरती सोळंकी हिनं देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, आरतीनं केलेल्या पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आरतीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. स्टोरीमध्ये आरती म्हणालेली की, "बहुतेक गुजरातवरुन विसर्जनासाठी आणलेला महागडा तराफा लालबागच्या राजाला आवडला नसावा, राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना... काय करणार..."
दरम्यान, लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) तब्बल 33 तासांनंतर विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आला. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
लालबागच्या राजाचे तब्बल 33 तासानंतर विसर्जन, विसर्जनला एवढा उशीर का झाला? काय आहेत कारणं?























