एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले.

मुंबई: विनोदात निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो, दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता अशा शब्दात अभिनेते अशोक सराफांनी दादा कोंडकेंच्या आठवणींना उजाळा दिला. दादा कोंडकेंच्या आठवणीत अशोक सराफ यावेळी काहीसे भावुकही झाले होते. 

रंगभूमीवर किंवा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना जितकं रडवणं सोपं असतं तितकचं हसवणं कठीण असतं. म्हणजे अनेकदा पडद्यावर किंवा रंगमंचावर असा एखादा प्रसंग असतो की ज्यामध्ये विनोदी संवाद अगदी खुमासदार असतो, पण प्रेक्षकांना हसवण्यात मात्र तो नापास होतो. अशा वेळी त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरतं ते विनोदाचं अचूक टायमिंग. हे टायमिंग अचूक साधणाऱ्यांच्या यादीमध्ये दादा कोंडकेंचं (Dada Kondke) नाव हे अगदी अव्वल स्थानी घेतलं जातं. एक काळ होता की दादा कोंडके यांनी हिंदी सिनेमा निर्मात्यांनाही घाम फोडला होता.

अभिनय, दिग्दर्शन, संवादलेखन, निर्माता अशा प्रत्येक भूमिकेत दादा कोंडके यांनी जादू केली होती. त्यामुळे बड्या निर्मात्यांनाही दादांच्या सिनेमापुढे आपल्या सिनेमाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. दादा कोंडकेंच्या सिनेमाची भुरळ आज जितकी पन्नाशीतल्या पिढीला आहे, तितकीच ती तरुण पिढीला देखील आहे. दादांच्या विनोदाचा हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला तो अशोक सराफांनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त अशोक मामांनी त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. विनोदाची पेरणी योग्य रित्या कशी करावी याचा मंत्र दादांनीच अशोकमामांना दिला होता.

नेमका काय आहे तो कानमंत्र?

दादा कोंडके यांनी अशोक सराफांना दिलेल्या त्या कानमंत्राबद्दल सांगताना अशोक मामा हे भावुक झाले होते. दादांना जशी विनोदाची नस सापडली होती तशीच नस अशोक सराफ यांनाही सापडल्याचं म्हटलं जातं. इतकचं नव्हे तर दादांच्या चाहत्यांच्या यादीमध्ये अशोक सराफ हे नाव प्रामुख्याने घेतलं जातं. यावर बोलताना अशोक सराफांनी म्हटलं की, “दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदात निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरूमंत्रच दिला होता. दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं.” 

‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने अशोक सराफांच्या कारकीर्दीला कलाटणी मिळाली.  ‘तुमचं आमचं जमलं’,‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन सिनेमात अशोक सराफांनी दादा कोंडकेंसोबत काम केलं. त्यांच्या या प्रवासाबद्दल सांगताना अशोक सराफांनी म्हटलं की, "दादांमध्ये खूप टॅंलंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचत. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश सिनेमे विनोदी ढंगातील करूनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला. सिनेमाच्या स्क्रीप्टवर त्यांची पकड होती. त्यामुळे प्रत्येक सीन पडद्यावर कसा दिसणार हे त्यांना आधीच कळायचं.लेखक राजेश मुजूमदार यांच्या साथीने दादांनी प्रत्येक सिनेमात कमाल केली आहे. दादांची हीच कमाल आता झी टॉकीजमुळे पुन्हा अनुभवता येणार याचा मला आनंद आहे."

झी  टॉकीज या वाहिनीवर सध्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या चित्रपटांची मेजवानी सध्या प्रेक्षकांना चाखायला मिळत आहे. दादा कोंडके यांचा 91 वा वाढदिवस 8 ऑगस्ट रोजी झाला. त्यानिमित्ताने 6 ऑगस्टपासून दर रविवारी दादांचे ज्युबिली स्टार चित्रपट झी टॉकीज वाहिनीवर दाखवण्यात आले. येत्या रविवारी 10 सप्टेंबर ला ज्यूबली स्टार सीजन ची सांगता 'आली अंगावर' ह्या  चित्रपटाने होणार आहे. 

हेही वाचा : 

Asha Bhosle : आशा भोसलेंचा दोन अटींसह लग्नाचा प्रस्ताव अन् दादा कोंडके 'बाबां'च्या सल्ल्यासाठी थेट कोल्हापुरात; अशा निराशेचा प्रसंग का आला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony :  5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधीUddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकरBaba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
Embed widget