मुलगा झाला हो! प्रसिद्ध मराठी कलाकाराच्या घरात हलला पाळणा, नव्या घरात केलं गोंडस बाळाचं आगमन
‘Sadhi Manasa’ Fame Aakash Nalawade Welcomes Baby Boy: ‘साधी माणसं’ मालिकेतील सत्या भूमिका साकारणारा आकाश नलावडे बाबा झाला आहे.

‘Sadhi Manasa’ Fame Aakash Nalawade Welcomes Baby Boy: 2026मध्ये अनेक कलाकारांनी आपल्या चाहत्यांसोबत आनंदाच्या बातम्या शेअर केल्या आहेत. आता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका साधी माणसं या मालिकेतील सत्या ही भूमिका साकारणारा अभिनेता आकाश नलावडे यानेही आपल्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेता बाबा झाला असून, त्यानं ही आनंदाची बातमी समाज माध्यमांच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या पोस्टवर कलाकार आणि नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सध्या अभिनेत्यानं शेअर केलेली बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आकाश नलावडे आणि रूचिका धुरी यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन
अभिनेता आकाश नलावडे आणि त्याची पत्नी रूचिका धुरी यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रूचिका धुरी हिनं एका मुलाला जन्म दिला आहे. काही महिन्यांपूर्वी आकाशने रूचिकाचे डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. तेव्हापासून मुलगा होणार की मुलगी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, आकाशने सोशल मीडियावर पोस्ट करून "बाबा झालो" अशी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच कलाकारांनी कमेंट करून जोडप्याचं अभिनंदन केलं आहे.
आकाश नलावडे मालिकेतून घराघरात पोहोचला
अभिनेता आकाश नलावडे हा सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाहवरील मालिकेत पश्या नावाची भूमिका साकारली होती. या मालिकेतील पात्र घराघरात पोहोचलं होतं. त्यानंतर आकाश नलावडे साधी माणसं या मालिकेत त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली. या मालिकेतील त्याची शिवानी बावकरसोबतची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सध्या आकाश नलावडेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
घराचे स्वप्न पूर्ण
View this post on Instagram
घरात नव्या पाहुण्याचं आगमन होण्यापूर्वी अभिनेता आकाश नलावडेनं घराचे स्वप्न देखील पूर्ण केले. त्यानं नव्या घराचे फोटो सोशल मीडियात शेअर केले. तसेच जुन्या घराचेही फोटो शेअर केले. त्यानं रूचिकाचे बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. या कार्यक्रमात त्यानं मुलगा व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, ही इच्छा पूर्ण झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
























