Mararthi Movie Gabh Sayali Bandkar Kailash Waghmare : मराठी सिनेसृष्टीत नवा चेहरा; सवाई एकांकिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
Mararthi Movie Gabh Sayali Bandkar Kailash Waghmare : एकांकिका, रंगभूमीवर चमक दाखवल्यानंतर आपल्या अभिनयाचे नाणे रुपेरी पडद्यावर खणखणीत वाजवणारे अनेक कलाकार सिनेसृ्ष्टीत कार्यरत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे.
Mararthi Movie Gabh Sayali Bandkar Kailash Waghmare : एकांकिका, रंगभूमीवर चमक दाखवल्यानंतर आपल्या अभिनयाचे नाणे रुपेरी पडद्यावर खणखणीत वाजवणारे अनेक कलाकार सिनेसृ्ष्टीत कार्यरत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाणार आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सवाई एकांकिका स्पर्धेत 2017 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक पटकावणारी अभिनेत्री सायली बांदकर (Sayali Bandkar) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गाभ' या मराठी चित्रपटातून सायली आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
शॉर्टफिल्म्स, अल्बम आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानांतर सायली आता रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सज्ज झाली आहे. सायलीने 2017 मध्ये सवाई एकांकिकेमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच पारितोषिक पटकावले होते. हेमोलिम्फ, आय आम वूमन, मिसिंग जॅक यासारख्या हिंदी शॉर्टफिल्मसमध्ये तिने पाहुण्या कलाकाराची, छोटीशी भूमिका साकारली. त्याशिवाय सायलीने 'यदाकदाचित','अलबत्या गलबत्या' या नाटकांमध्येही काम केले. आता सायली ‘गाभ’ चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे ( Kailash Waghmare) सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री सायलीने आपल्या पदार्पणतील चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना सांगितले की, ‘वास्तवतेच्या जवळ जाणारी भूमिका मला ‘गाभ’ या चित्रपटात साकारायला मिळाली आहे. फुलवा ही व्यक्तिरेखा मी यात साकारली आहे. गावखेड्याची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाची कथा रेड्याभोवती फिरते. प्राण्यांशी माझी फारशी जवळीक नाही. मात्र या चित्रपटानंतर माझ्यात प्राण्यांबाबत वेगळी आत्मीयता निर्माण झाली.आपण जे बोलतो ते प्राण्यांना समजतं. त्यांना सांभाळताना कोडिंग किंवा काही टेक्निक लक्षात घेतलं की, आपली त्यांच्यासोबत गट्टी होऊ शकते. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पाहायला मिळेल असे तिने सांगितले. चित्रपटाबाबत सायली म्हणाली की, 'गाभ' हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल आहे. या चित्रपटाने मला नवी वाट दाखवली. अभिनेता कैलासकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. यापुढे एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न असेल असेही तिने सांगितले.
View this post on Instagram
‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईमलॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्याची गावच्या रांगड्या मातीच्या पार्श्वभूमीवरील ‘ गाभ’ या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.