एक्स्प्लोर

Manjiri Oak on Sons Engagement: 'लेकाच्या साखरपुड्याचा गाजावाजा करायचा नव्हता...'; प्रसाद ओकची बायको सुनेविषयी म्हणाली...

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लेकाच्या साखरपुड्याविषयी, सुनेविषयी सांगितलंय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या चर्चा रंगलीय.

Manjeri Oak: मराठी मनोरंजन विश्वात प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे लोकप्रिय जोडपं आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसनांवर मिश्किल प्रतिक्रिया देणारा अभिनेता प्रसाद ओक कायम चर्चेत असतो.केवळ प्रसाद ओक नाही तर त्याची बायको मंजिरी ओकही (Manjari Oak) रिल्समुळे घराघरात पोहोचली आहे. मंजिरी ही निर्मातीही आहे. अलीकडेच प्रसाद ओक आणि मंजिरी ओक लेकाच्या साखरपुड्यामुळे चर्चेत होते. दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रसाद आणि मंजिरीच्या मुलाचा साखरपुडा झाला. (Prasad Oak Manjiri Oak) साखरपुड्यातील फोटो व्हायरल झाल्यामुळे मनोरंजनसृष्टीसह अनेक चाहत्यांनीही दोघांवर भरभरून अभिनंदनच वर्षाव केला. योगायोग म्हणजे एकीकडे 'लाडकी विहीण योजना ' नावाचं नाटक मंजिरी करत होती त्याचवेळी ती खऱ्या आयुष्यातही विहिणीची भूमिका निभावत होती. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लेकाच्या साखरपुड्याविषयी, सुनेविषयी सांगितलंय. तिच्या प्रतिक्रियेची सध्या चर्चा रंगलीय.

गाजावाजा करायचा नव्हता ...

लेकाच्या साखरपुड्याबद्दल 'अभिजात मराठी फिल्मी'शी बोलताना ती म्हणाली, " इंडस्ट्रीतील अनेकांना माझ्या मुलाचा साखरपुडा झाला याचा शॉक बसला. अनेकजण म्हणाले दोघं खूप लहान आहेत. लहान वयात मुलांचं लग्न करताय का ? पण तसं नाहीय. पण, तसं नाही, आम्ही आता मुलाचं लग्न करण्याच्या मार्गावर आहोत. माझा मुलगा आता 25 वर्षांचा आहे.तो जर्मनीला असतो.तो शिकला तिथेच.तिथेच नोकरी करतो.बऱ्यापैकी सेटल आहे.अर्थात त्याला खूप काम करायचा आहे.पण तरीही हळूहळू त्याची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे.त्यामुळे असं वाटलं की त्याला साखरपुडा करून टाकूया. आणि हा साखरपुडा खूप अचानक ठरला.आमच्यासाठीही अचानक होतं.अर्थात त्यामुळेच कुठे त्याचा गाजावाजा करणार नव्हतं. पण आमची मैत्रीण अमृता खानविलकर तिने एक स्टोरी टाकली आणि ते अर्थात सगळ्यांना कळलं. अर्थात ती वाईट गोष्ट नाही, चांगलीच गोष्ट आहे. माझा मोठा मुलगा सोशल मीडियापासून जरा लांब आहे.त्यामुळे तो जरा concious आहे याबाबतीत. पण ठीक आहे, ज्यांना कळलं त्यांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलो. "असं मंजिरी यांनी सांगितलं.

सुनेविषयी काय म्हणाल्या मंजिरी ओक ?

मंजिरी ओक म्हणाल्या" माझा मोठा मुलगा जर्मनीला शिकायला आहे. नंतर नोकरी लागली.तोही 18 व्या वर्षी तिकडे गेला.एक तर राहत होता कितीतरी वाईट अनुभव आले असतील.ते त्याचे त्याचे त्याच्या पद्धतीने डील केले. तो अत्यंत जबाबदार मुलगा आहे. तो एका व्यक्तीची जबाबदारी घेणार आहे. जिची जबाबदारी घेणार आहे तीही जबाबदार आहे. घरातल्या कुठल्याही मुला मुलीचे लग्न ठरलं की आई बाप हळवे होतात. "

" माझ्या नशिबाने माझी सून उत्तम सुगरण आहे. मारवाडी तर ती करतेच पण मराठी पदार्थ उत्तम शिकलेत तिने. तिला खूप आवड आहे. " असं मंजिरी म्हणाल्या. 

सासूला आई म्हणण्याचा अट्टाहास नको...

ज्या महिला सासू होणार आहेत, किंवा झाल्या आहेत त्यांच्यासाठी मंजिरी यांनी सांगितलं , "सुनेशी वाकताना काही ठरवून नाही वागलं पाहिजे. ते काही 1+1=2 असं गणित नाही. दोन माणसे एकत्र येणार आहेत. आपल्याकडे सासू आणि सून या नात्याला इतकं ग्लॅमर आहे. माझ्या होणाऱ्या सुनेने मला विचारलं की 'काकू, लोक विचारता आहेत की ही सासू आहे का ?' त्यावर तिची आई तिला ओरडली की आता काकू नाही आई म्हणायचं. त्यावर मी त्यांना असं सांगितलं ' आई एकच असते. जी जन्म देते ती आई असते.तिने मला आई म्हणावं याचा तिच्यावर अट्टाहास करू नका. मलाही नकोय तिने मला आई म्हणावं. आई म्हणावं आणि मनात आईसारखी भावना नसेल त्यापेक्षा नको. त्यापेक्षा आई नको म्हणून आणि मनात आईसारखे भावना ठेव.' असं मंजिरी म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget