एक्स्प्लोर

पुरस्कार आला पण पैसा गेला!

मंदार यांनी वादळवाट, अभाळमाया, होणार सून मी ह्या घरची या मालिकांवर काम केलं. पण यात महत्वाची बाब अशी की त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठीतले अनुभवी निर्माते मानले जाणारे मंदार देवस्थळी यांच्या आर्थिक विवंचनेबाबत अनेक बातम्या येता आहेत. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली बाजू मांडली. पण त्या चर्चेत एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे. मंदार यांच्या या स्थितीला बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी सिनेमा कारणीभूत असल्याचं बोललं जातं आहे.

मंदार यांनी वादळवाट, अभाळमाया, होणार सून मी ह्या घरची या मालिकांवर काम केलं. पण यात महत्वाची बाब अशी की त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवला आहे. अस असलं तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला तितके यश न मिळाल्याने निर्माता म्हणून देवस्थळी यांना काही कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाचा उल्लेख केला आहे. त्यात आपल्याला तोटा झाल्याचंही नमूद केलं आहे. तो चित्रपट म्हणजे कच्चा लिंबू होय. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं होतं. तर यात रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने महोत्सवात बाजी मारली. राष्ट्रीय पारितोषिक मिळवलं. पण बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट तितका चालला नाही.

मंदार यांचे अनेक निर्णय चुकले हे त्यांनी सांगितलं आहेच. पण त्यात या चित्रपटावेळी झालेला तोटा मोठा असल्याचं बोललं जातं. यावरून पुन्हा एकदा आपल्याकडे आशयघन चित्रपट चालत नसल्याचं समोर येत. ही बाब केवळ कच्चा लिंबू या चित्रपटाची नाही. तर पुरस्कारात बाजी मिळवलेले धग, नागरिक, लेथ जोशी आदी चित्रपटांची अवस्था अशीच झाली आहे. रसिकाश्रय मिळाला तरच निर्माता तरेल ही काळ्या दगडावरची रेष ठरली आहे.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee on viral video: 'काळी जादूचा संशय, महिलेला झाडाला बांधून मारहाण'; VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री संतापली, म्हणाली, 'सरकारने...'
'काळी जादूचा संशय, महिलेला झाडाला बांधून मारहाण'; VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री संतापली, म्हणाली, 'सरकारने...'
Dhananjay powar on Janhavi Kolhapur Statement: 'तिची चूक असती तर, कोल्हापूरकरांची माफी...'; जान्हवी किल्लेकरच्या 'त्या' वक्तव्यावर धनंजय पोवार म्हणाला...
'तिची चूक असती तर, कोल्हापूरकरांची माफी...'; जान्हवी किल्लेकरच्या 'त्या' वक्तव्यावर धनंजय पोवार म्हणाला...
छोटा पुढारी घनःश्याम दरोडेनं दिली गूड न्यूज, व्हिडीओमधून चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाला... VIDEO
छोटा पुढारी घनःश्याम दरोडेनं दिली गूड न्यूज, व्हिडीओमधून चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी, म्हणाला... VIDEO
Pratyusha Banerjee case: 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट
'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं उचललं टोकाचं पाऊल; आई - वडिलांचा बॉयफ्रेंडवर संशय, प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणात कोर्टात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
'लालबागचा राजा'चरणी सोन्याची वीट अर्पण, मौल्यवान वस्तूंचा आज होतोय लिलाव; बाजारभावानुसार किंमत किती?
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
मुंबईतील BMC अधिकाऱ्यांनी 3.50 लाखांची लाच मागितली; एसीबीने सापळा रचला, आरोपींच्या घराचीही झाडाडती
Embed widget