एक्स्प्लोर

Kamali Zee Marathi Serial: 'थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येतेय...'; 'कमळी' मालिकेत 'त्या' अभिनेत्रीची पुन्हा एन्ट्री; मोठा ट्वीस्ट, पुढे काय घडणार?

Kamali Zee Marathi Serial: मला वाटलं माझी भूमिका संपली, काही दिवसांपूर्वीच एक्झिट अन् आता 'कमळी' मालिकेत अभिनेत्रीची पुन्हा एंट्री; कथानकही वळण घेणार?

Kamali Zee Marathi Serial: 'कमळी' मालिका (Kamali Marathi Serial) सध्या अत्यंत मनोरंजक वळणावर आली आहे. कमळी (Kamali Serial) पुन्हा अन्नपूर्णा हाऊसमध्ये परतली असून कमळी आणि कामिनी यांच्यात थरारक सामना रंगला आहे. तर साई भंडाऱ्याच्या मंगलमय वातावरणात नियती कमळी आणि सरोजला पुन्हा एकदा समोरासमोर आणणार आहे. याआधी सरोजवर झालेल्या गोळीबारानंतर तिच्या पात्राचं पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. या संपूर्ण ट्रॅकच्या चित्रीकरणाबद्दल सरोजची भूमिका साकारणारी योगिनी चौक हिनं तिचा अनुभव शेअर केलाय.

अभिनेत्री योगिनी चौक (Actress Yogini Chauk) म्हणाली, "सरोजला गोळी लागल्यानंतर मलाच वाटू लागलं होतं की, आता माझं पात्र मालिकेतून संपणार की काय... पुढे कथेत काय होणार? याची आम्हा कलाकारांनाही कल्पना नसते. त्यामुळे मी आमच्या क्रिएटिव्ह टीमला विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, सरोजला गोळी लागेल, पण ती वाचणार आहे. गोळी लागण्याचा सीन मी आयुष्यात पहिल्यांदाच केला. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. पडद्यावर तो प्रसंग खरा वाटावा यासाठी शरीराची हालचाल, चेहऱ्यावरील भाव आणि प्रत्येक गोष्टीकडे मी विशेष लक्ष दिलं. आमचे दिग्दर्शक यांनी प्रत्येक बारकावा समजावून सांगितला. त्यामुळे हा सीन करताना खूप काही शिकायला मिळालं. रक्त उडण्याचा इफेक्ट आणि संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणं हा वेगळाच अनुभव होता. मात्र, सरोजच्या पात्रावर एवढं संकट येताना अभिनेत्री म्हणून मला खूप वाईटही वाटलं. त्या दिवशी मी भावूक झाले होते. पण मनात विश्वास होता की, सरोज पुन्हा परत येईल. हा भाग प्रसारित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून आणि मित्रांकडून खूप मेसेज आणि फोन आले. 'सरोज आता मरणार का?', 'तू आता मालिकेत नाहीस का?', 'नवीन मालिका स्वीकारलीस का?' असे अनेक प्रश्न मला विचारले गेले. तेव्हा मी फक्त एवढंच सांगायचे की, थोडा ब्रेक आहे, पण मी पुन्हा येणार आहे..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

साई भंडाऱ्यातील आणि गोळी लागल्यावर पडण्याचा सीनही तितकाच आव्हानात्मक होता. कमळी माझा हात पकडते आणि माझा हात निसटतो, हा प्रसंग खरा वाटावा यासाठी आम्ही अनेक रिटेक्स केले. अशा स्टंट सीन्सचं चित्रीकरण कसं केलं जातं, हे त्या दिवशी जवळून शिकायला मिळालं. हा संपूर्ण अनुभव खूप शिकण्यासारखा होता. त्यासाठी मी आमचे लेखक, दिग्दर्शक आणि संपूर्ण निर्मिती टीमची मनापासून आभारी आहे.

साई मंदिरातील प्रसंगात कमळीला तिची आई जिवंत असल्याची जाणीव होऊ लागते आणि त्यानंतर कमळी आणि सरोज यांची  भेट घडते. सरोज कशी वाचते, हेही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अपघातानंतर तिची स्मरणशक्ती कमी झालेय, तिला काही ठरावीक काळातल्या गोष्टी आठवतात, आणि ती जणू काही काळ मागे थांबल्यासारखी का वागते, हेही येणाऱ्या भागांमध्ये उलगडणार आहे. आता कमळी आणि सरोजचं नातं पुढे कोणतं वळण घेतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूप मनोरंजक ठरणार आहे. आता कमळी–सरोजची ही भेट पुढे काय घडवणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tejashree Pradhan Buys New Luxury Mercedes Car: तेजश्री प्रधानकडे गूड न्यूज; महिन्याभरानं पोस्ट करुन चाहत्यांना दिलं सरप्राईज, सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
Satish Rajwade Natak: रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
रहस्य अन् तपासाचा थरार! सतीश राजवाडे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत, 'या' नाटकाची प्रचंड चर्चा
Gautami Patil On Viral Video Controversy: 'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
'तो' व्हिडीओ व्हायरल झाला अन्...'; गौतमी पाटीलनं सांगितला आयुष्यातला सर्वात धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'लाज वाटत...'
Lata Mangeshkar Song: लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
लता मंगेशकरांचं 78 वर्षांपूर्वीचं कल्ट गाणं; रेल्वे स्टेशनवर सिगारेटच्या पाकिटावर सुचली धून, निर्मात्यांनी आधी दिलेला नकार पण...
Advertisement

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Embed widget