एक्स्प्लोर

Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल

Railway Ticket Booking IRCTC : काही दिवसांपूर्वी जयपूर येथील 'मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या विद्यार्थ्यांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील अनेक गंभीर त्रुटी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

पुणे: रेल्वे तिकिटाचे ऑनलाईन आरक्षण करताना येणारे अनावश्यक पॉपअप्स, वारंवार भरावा लागणारा कॅप्चा (Captcha) आणि तिकीट बुक होण्यासाठी लागणारा प्रदीर्घ वेळ यामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आयआरसीटीसी (IRCTC) च्या तिकीट बुकिंग सुविधेत आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाची (Website) एक सुधारित 'बीटा आवृत्ती' (Beta Version) तयार करण्यात आली असून, ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Railway Ticket Booking IRCTC : विद्यार्थ्यांच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग

काही दिवसांपूर्वी जयपूर येथील 'मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या विद्यार्थ्यांनी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील अनेक गंभीर त्रुटी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. यानंतर रेल्वेने तातडीने पावले उचलत १५ जुलैपर्यंत या संकेतस्थळात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आयआरसीटीसी आणि रेल्वे सूचना प्रणाली केंद्राच्या (CRIS) अधिकाऱ्यांनी जयपूरमध्ये या विद्यार्थ्यांसमोर नवीन संकेतस्थळाची बीटा आवृत्ती सादर केली असून त्यावर विद्यार्थ्यांचे अभिप्राय (Feedback) मागवले आहेत.

Railway Ticket Booking IRCTC :नव्या संकेतस्थळात नेमके काय बदलणार?

प्रवाशांचा बुकिंगचा अनुभव सुलभ करण्यासाठी नवीन आवृत्तीत पुढील महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:

कॅप्चा आणि पॉपअप्स हद्दपार: तिकीट बुक करताना मध्येच येणारे अनावश्यक कॅप्चा, पॉपअप्स आणि जड ग्राफिक्स काढून टाकण्यात आले आहेत.

जागांची उपलब्धता एकाच स्क्रीनवर: प्रवाशांना आता सर्व वर्गांमधील (Classes) उपलब्ध जागांची माहिती वेगवेगळ्या पर्यायांवर न जाता एकाच स्क्रीनवर पाहता येईल.

फास्ट बुकिंग सुविधा: तिकीट बुक करण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या (Steps) कमी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अवघ्या काही सेकंदांत तिकीट बुक होईल.

एकदाच माहिती भरावी लागणार: जे प्रवासी वारंवार प्रवास करतात, त्यांना प्रवाशांची माहिती पुन्हा पुन्हा टाईप करावी लागणार नाही. ती माहिती एकदाच सेव्ह राहील.

Railway Ticket Booking IRCTC : आरक्षण यंत्रणेचा कायापालट

आयआरसीटीसीचे हे नवीन संकेतस्थळ रेल्वेच्या जवळपास ४० वर्षे जुन्या 'पॅसेंजर रिझर्व्हेशन इंजिन' (Passenger Reservation Engine) या प्रणालीशी जोडण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ही जुनी आरक्षण यंत्रणा देखील समांतर पद्धतीने पूर्णपणे अपडेट केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण क्षमतेने काम करणारे हे नवीन आयआरसीटीसी पोर्टल पुढील काही महिन्यांत अधिकृतपणे लाँच केले जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रेल्वेच्या अधिकृत 'RailOne' या ॲपने ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा पार केला असून, ते देशातील सर्वात मोठे रेल्वे तिकीट बुकिंग ॲप बनले आहे. या ॲपवर तत्काळ बुकिंगच्या वेळी होणारा 'बॉट्स'चा (Bots) बेकायदेशीर वापर रोखण्यासाठीही रेल्वे विशेष सुरक्षा यंत्रणा राबवत आहे. हे सर्व महत्त्वाचे बदल मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सूचनांमुळेच शक्य झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी आवर्जून नमूद केले.

प्रवाशांना रेल्वे तिकिटाचे आरक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' (IRCTC) आज, १५ जुलै रोजी आपल्या नवीन आणि अत्याधुनिक संकेतस्थळाचे (Website) अनावरण करणार आहे. नव्या वेबसाईटमुळे प्रवाशांना जलद गतीने तिकीट बुक करता येईल, बुकिंगची क्षमता वाढेल आणि विशेषतः 'तत्काळ' बुकिंग दरम्यान होणारा मनस्ताप कायमचा दूर होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

Railway Ticket Booking IRCTC : नव्या वेबसाईटची वैशिष्ट्ये: प्रवाशांना काय मिळणार?

वेबसाईटच्या वेगाव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत:

आवडीची जागा निवडण्याची मुभा (Seat Preference): आता प्रवाशांना केवळ संगणकीय पद्धतीने जागा मिळण्याऐवजी, स्वतःच्या आवडीची सीट निवडता येणार आहे.

भाडे कॅलेंडर (Fare Calendar): ज्या प्रवाशांच्या प्रवासाच्या तारखा लवचिक आहेत, त्यांना वेगवेगळ्या दिवसांचे तिकीट दर तपासून स्वस्त तिकीट बुक करणे सोपे जाईल.

सर्व वर्गांची माहिती एकाच स्क्रीनवर: स्लीपर, एसी ३ टायर, एसी २ टायर अशा वेगवेगळ्या वर्गांमधील उपलब्ध जागा पाहण्यासाठी प्रवाशांना आता वारंवार पर्याय बदलण्याची गरज नाही. सर्व वर्गांची माहिती एकाच स्क्रीनवर उपलब्ध असेल.

Railway Ticket Booking IRCTC : प्रादेशिक भाषा आणि दिव्यांगांसाठी विशेष सोय

नवे संकेतस्थळ केवळ इंग्रजी किंवा हिंदीपुरते मर्यादित न राहता विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही तिकीट काढणे सोपे होईल. याशिवाय दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी आणि रुग्ण यांच्यासाठी सवलतीच्या तिकिटांची प्रक्रिया आता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये न जाता एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Railway Ticket Booking IRCTC : पॉप-अप्स आणि कॅप्चामधून सुटका

तत्काळ बुकिंगच्या वेळी प्रवाशांचा सर्वात जास्त वेळ खाणारे अनावश्यक पॉप-अप्स, जाहिरातींचे बॅनर्स आणि वारंवार विचारला जाणारा 'कॅप्चा' नवीन इंटरफेसमधून काढून टाकण्यात आला आहे. यामुळे 'सर्च' आणि 'कन्फर्म'मधील अंतर कमी होऊन प्रवाशांचे तिकीट हुकण्याची शक्यता फार कमी होईल.

Railway Ticket Booking IRCTC : बुकिंग क्षमतेत तब्बल ५ पटीने वाढ!

सध्याच्या यंत्रणेवर सकाळी तत्काळ बुकिंग सुरू होताच लाखो युजर्स एकाच मिनिटात लॉगिन करतात, ज्यामुळे पेमेंट अडकणे किंवा तिकीट बुक होण्यापूर्वीच जागा संपणे अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून नवी यंत्रणा प्रति मिनिट १.५ लाख (१,५०,०००) पेक्षा जास्त तिकीट बुकिंग हाताळू शकेल, जी सध्याच्या ३२,००० प्रति मिनिट क्षमतेपेक्षा पाच पट जास्त आहे. तसेच, 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (PRS) ची चौकशी हाताळण्याची क्षमता प्रति मिनिट ४ लाखांवरून थेट ४० लाख एवढी करण्यात आली आहे.

Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे क्षेत्रातील इतर मोठ्या सुधारणा

हा बदल केवळ वेबसाईट पुरता मर्यादित नसून, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या रचनेत एकूण ५२ मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे:

कंत्राटदारांसाठी कडक नियम: रेल्वे प्रकल्पांसाठी बोली लावणाऱ्या कंत्राटदारांना आता १० टक्के परफॉर्मन्स सिक्युरिटी आधीच जमा करावी लागेल. ज्या कंपन्यांचे न्यायालयीन खटले त्यांच्या एकूण मालमत्तेच्या (Net Worth) निम्म्याहून अधिक आहेत, त्यांना कंत्राटासाठी बंदी घातली जाईल. यामुळे दर्जेदार कामे होतील आणि केवळ वाद घालणारे कंत्राटदार बाजूला होतील.

मालवाहतूक (Freight) क्षेत्राचा कायापालट: उद्योग आता त्यांच्या गरजेनुसार स्वतःचे मालवाहू वाघिण (Wagons) डिझाइन करू शकतील. देशात दरवर्षी निर्माण होणाऱ्या ३४० दशलक्ष मेट्रिक टन 'फ्लाय ॲश'ची (कोळशाची राख) वाहतूक प्रदूषण रोखण्यासाठी आता खुल्याऐवजी बंद कंटेनरमधून केली जाईल. कंटेनर ट्रेन ऑपरेटरसाठी २५ कोटी रुपयांची एकरकमी फी ठेवून ऑल इंडिया लायसन्स सुलभ केले आहे, ज्याला २० वर्षे नूतनीकरण करावे लागणार नाही.

कौशल्य प्रमाणपत्र आणि जमीन अधिग्रहण: वेल्डिंग, प्लंबिंग आणि कंक्रीट टेस्टिंग करणाऱ्या कामगारांना अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल, हा प्रकल्प पुढील २४ महिन्यांत पूर्ण केला जाईल. तसेच, जमीन अधिग्रहणाचा वेग वाढवण्यासाठी 'रेल्वे भूमी' (Rail Bhoomi) नावाचे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रकल्पांचा वेळ ३० ते ४० टक्क्यांनी वाचेल.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषणाला उभ्या राहिल्या अन् अचानक जोरदार घोषणाबाजी; नंतर चंद्राबाबू नायडूंनी स्वतः माईक हाती घेतला अन्..., नेमकं काय घडलं?
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Embed widget