Manasi Naik : मानसी नाईकच्या एक्स नवऱ्यानं साखरपुडा उरकला, अभिनेत्री पोस्ट करत म्हणाली, 'तुम्हाला साजेसं...'
Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईकच्या एक्स नवऱ्याने साखरपुडा उरकल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे. तिचा एक्स नवरा प्रदीप खरेरा याने नुकताच साखरपुडा उरकला आहे. त्यानंतर आता मानसी नाईकच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. प्रदीपच्या साखरपुड्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावर बरीच खळबळ माजली. त्यानंतर आता मानसीची पोस्टही साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मानसी आणि प्रदीपने 2021 मध्ये लग्न केलं होतं. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर बऱ्याचदा मानसी पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यावर मानसीने फार भाष्य केलं नाही. पण इकडे तिच्या एक्स नवऱ्याने सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर विशाखा पनवार हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे.
मानसीची पोस्ट काय?
मानसीने तिच्या सोशल मीडियावर पिवळ्या साडीतले फोटो शेअर केले आहेत. त्यावर मानसीने दिलेल्या कॅप्सनने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंवर कॅप्शन देत म्हटलं की, आपल्याला काहीतरी मिळतंय, या गोष्टीवर या जगात सेटल होण्यापेक्षा सिंगल राहणं खूप धाडसाचं असतं. त्यामुळे तुमच्या आयुष्यात Prayer (प्रार्थना), Priorities (प्राधान्यक्रम), Peace(शांतता), Positivity (सकारात्मकता), Patience (संयम) या ‘P’ वर तुम्ही ठाम राहा.
पुढे तिने म्हटलं की, तुम्हाला जोपर्यंत कुणी साजेसं भेटत नाही, तोपर्यंत तुम्ही सिंगल राहा, सेटल होण्याचं टेन्शन घेऊ नका. प्रेमाची अपेक्षा ठेवा, त्यासाठी प्रार्थना करा, स्वप्न पाहा, पण प्रेमाची वाट पाहण्याचं तुमचं आयुष्य अजिबात थांबवू नका. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा सिंगल राहणं कधीही चांगलं आहे. या वर्षात मी मी हरले, जिंकले, अपयशी झाले, रडले, हसले, प्रेम केलं पण मी कधीही झुकले नाही. कारण कणखर स्त्रिया कधीही हार मानत नाही.
कधीतरी आपल्याला एकट्यानेच कॉफी घ्यावीशी वाटले, कधीतरी थोडं रडावलंसही वाटेल किंवा कधीतरी एखाद्या दिवशी काहीच काम न करण्याची इच्छा होऊ शकते. पण यानंतर ज्या स्त्रिया कणखर असतात, त्या सशक्त होऊन पुन्हा कामाला लागतात. आता मी कधीही मागे वळून पाहत नाही, आता मी कधीही हार मानणार नाही, कधीच नाही. चीयर्स टू बीइंग मी, असं म्हणत मानसीने तिच्या पोस्टचा शेवट केला आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
