मृण्मयी देशपांडेच्या 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या नावावरून नवा वाद, ट्रेलर हटवण्याची मागणी, नेमकं झालं काय?
ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात. पण आता या चित्रपटाच्या नावावरून वाद सुरु झालं आहे.

Manache Shlok Marathi Movie: मराठी चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आरपार, प्रेमाची गोष्ट चित्रपटांच्या गाण्यांनी, ट्रेलर, टिझरने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. त्यातच सध्या 'मनाचे श्लोक ' या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे . अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा (Mrunmayi Deshpande) दिग्दर्शक म्हणून नवा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे . पण या चित्रपटाच्या नावावरून सध्या वादाला सुरुवात झाली आहे . मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिलाय
नेमका वाद काय ?
मनाचे श्लोक चित्रपट वादाच्या भवऱ्यातसापडला असून मनाचे श्लोक चित्रपटाचा ट्रेझर सोशल मीडिया वरून हटवावा आणि चित्रपटाचे नाव बदलावे, अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिला आहे. “मनाचे श्लोक” या पवित्र ग्रंथाच्या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्याबद्दल जाहीर निषेध श्रीसमर्थ सेवा मंडळ,सज्जनगड आणि समस्त समर्थभक्तातर्फे करण्यात आला आहे.. मनाचे श्लोक याचा ट्रेझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे, तो हटवावा. त्याचबरोबर पवित्र हिंदू विवाह संस्था या बदलाचे चुकी चे तत्त्वज्ञान रामदासी सांप्रदायाचा आधार घेऊन जनमानसावर थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे..ते थांबवावे त्याचबरोबर मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव त्वरित बदलावे आणि तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित होऊ नये अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगडचे ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी यांनी दिला आहे.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये श्लोक-मनवाची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची धावपळ आणि स्थळांच्या गंमतीजंमती ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवासाठी तिचे कुटुंबही स्थळं पाहात आहे. या सगळ्या गडबडीत त्या दोघांच्या स्वप्नांचे काय होणार, ते दोघं एकत्र येतील का, लग्नासाठी तयार होतील का, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ट्रेलरमध्ये हसू, गोडवा आणि भावनिक क्षण एकत्र पाहायला मिळतात. पण आता या चित्रपटाच्या नावावरून वाद सुरु झालं आहे.


















