Mumbai High Court On Manache Shlok Movie: समर्थ रामदासांच्या श्लोकातील ओळींचा संदर्भ देत, उच्च न्यायालयाकडून 'मना'चे श्लोकचा मार्ग मोकळा
Mumbai High Court On Manache Shlok Movie: उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर 'मना'चे श्लोक प्रदर्शित करण्यात आला असून या प्रकरणाचा निकाल देताना समर्थ रामदासांच्या श्लोकातील काही ओळींचा संदर्भ न्यायालयाकडूनच देण्यात आला.

Mumbai High Court On Manache Shlok Movie: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Actress Mrunmayee Deshpande) हिचं दिग्दर्शिन असलेल्या 'मना'चे श्लोक' (Manache Shlok) सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गुरुवारी हायकोर्टानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. मराठी चित्रपट (Marathi Movie) मनाचे श्लोक या चित्रपटाचे शीर्षकाचे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य आहे, त्याचा श्री समर्थ रामदास स्वामींशी काहीही संबंध नाही, असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं सिनेमाच्या निर्मात्यांच्या बाजूनं निकाल दिला. विशेष बाब म्हणजे, या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयानं 'जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे...', या समर्थ रामदास स्वामींच्या 'मनाचे श्लोका'तील काही ओळींचा संदर्भ दिला.
'मना'चे श्लोक' या मराठी सिनेमाचा संबंध समर्थ रामदास स्वामींशी जोडण्यात आलेला. तसेच, श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्याकडून विरोध करण्यात आलेला. पवित्र ग्रंथाच्या नावाचा चित्रपटासाठी वापर केल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आलेली. 'ग्रंथाच्या नावाचा वापर मनोरंजन, काल्पनिक कथांसाठी नको, असं श्रीसमर्थ सेवा मंडळानं केला आहे. तसेच मनाचे श्लोकचा ट्रेलर सोशल मीडियावरुन हटवून चित्रपटाचं नाव बदलावं, अन्यथा भक्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा विश्वस्त प्रवीण कुलकर्णी यांनी दिलेला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलेलं. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांच्या अडचणींत काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं. अखेर न्यायालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर आज सिनेमा प्रदर्शित झाला आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसच्या शर्यतीत खरा उतरतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सुनावणीवेळी न्यायालयात काय-काय घडलं?
मराठी चित्रपट मनाचे श्लोक या चित्रपटाचे शीर्षकाचे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकाशी साधर्म्य आहे, त्याचा श्री समर्थ रामदास स्वामींशी काहीही संबंध नाही, असं निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयानं गुरुवारी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला. निकाल देताना न्या संदेश पाटील यांनी जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, हा समर्थ रामदास स्वामींचा 'मनाचे श्लोक'मधील एक श्लोक म्हणून दाखवला.
समर्थ रामदास स्वामीच्या मनाचे श्लोक यांच्याशी चित्रपटाच्या शीर्षकाचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयानं चित्रपट निर्मात्यांना दिले. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे तसेच, चित्रपटाच्या ट्रेलरमुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या धार्मिक भावना आणि विचारसरणी दुखावल्या जातील.
चित्रपटाच्या शिर्षकामुळे श्री समर्थ रामदास स्वामींच्या अनेक हिंदू अनुयायांचा अनादर करण्यासारखं असल्याचं सांगत, चित्रपटाच्या प्रमाणपत्राला आणि प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडाच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्या याचिकेवर गुरुवारी न्या.रेवती-मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















