मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांवर बंदी; 'अंधेरा हो गया है जीवन मे....', सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
जर्मनी, इटली, इराण, सिंगापूर, बांगलादेश या देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. आता या यादीत मालदीवचाही समावेश झाला आहे.

मुंबई : भारतात कोरोना विषाणूची लाट भयावह रुप घेताना दिसत आहे. कला, क्रीडा या विश्वांपासून व्यवसाय क्षेत्र आणि दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. दर दिवशी देशात 3 लाखांच्या घरात नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. ही सर्व परिस्थिती पाहता, जर्मनी, इटली, इराण, सिंगापूर, बांगलादेश या देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. आता या यादीत मालदीवचाही समावेश झाला आहे.
मालटीवमधील पर्यटन मंत्रालयानं रविवारी हा महत्त्वाचा निर्णय घेत कोरोनाला रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं. या निर्णयाच्या अधिकृत घोषणेनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्सना उधाण आलं. मागील बऱ्याच काळापासून अनेक सेलिब्रिटींनी मालदीवची वाट धरली होती. इथं भारतात कोरोना थैमान घालत असताना सेलिब्रिटी मंडळी मात्र थेट मालदीव बेटांच्या दिशेनं वाट धरताना दिसत होते.
जान्हवी कपूर, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर या सेलिब्रिटींनी नुकतीच मालदीववारी केली. पण, आता मात्र त्यांच्याबाबत अनेक मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मालदिवमधील सुट्टीनंतर मायदेशी परतले रणबीर- आलिया
Maldives suspends tourists from India
— Indian Memes (@Theindianmeme) April 26, 2021
Bollywood celebrities: pic.twitter.com/mkdGXuYkJE
Maldives bans Indian tourists from stay at hotels, resorts and guest houses...😌🔥
— 👑 Prince👑 (@TheLolnayak) April 26, 2021
Meanwhile Bollywoodias Rn..
🥲😢🥲#Maldives #bollywood #AjeebDaastaans pic.twitter.com/ycFEWnjJYS
Maldives suspends tourists from India
— Tafsir🇮🇳 (@tafsircasm) April 26, 2021
Bollywood : pic.twitter.com/7pFYGgefsn
Maldives banned Indian Tourist due to covid
— Sarcasto (@Sarco69) April 26, 2021
Le* Bollywood Celebs:-*To Maldives authority* pic.twitter.com/RxdcJiGS0a
Bollywood celebrities rushing for the Maldives while watching people in India die... #CovidIndia pic.twitter.com/KUFrVUixm1
— Delhi Decoded (@DelhiDecoded) April 26, 2021
बी- टाऊनच्या या सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या सुट्ट्यांदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पण, आता मात्र याच फोटोंमुळं त्यांची खिल्लीही उडवण्यात येत आहे. मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांवर बंदी घातल्याचं जाहीर होताच सेलिब्रिटींची प्रतिक्रिया नेमकी कशी असेल याचे असंख्य विनोदी मीम्स अनेक युजर्सनी पोस्ट केले आहेत. चित्रपटातील संवादस एखादं दृश्य इथपासून काही छायाचित्रांचा आधार घेत सध्या हे प्रकरण कमालीचं व्हायरल होत आहे.























