मालदिवमधील सुट्टीनंतर मायदेशी परतले रणबीर- आलिया
कोरोना काळात मुंबई आणि भारतातून अनेक कलाकारांनी परदेशाची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचाही समावेश होता

मुंबई : कोरोना काळात मुंबई आणि भारतातून अनेक कलाकारांनी परदेशाची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचाही समावेश होता. कोरोनातून सावरल्यानंतर बी- टाऊनची ही सेलिब्रिटी जोडीही परदेशातील वाट धरताना दिसली. आता म्हणे मालदीवहून ही जोडी मायदेशी परतली आहे. मुंबई विमानतळावर या जोडीला पाहिलं गेलं.
यावेळी आलियानं पांढऱ्या रंगाची जिन्स आणि कॅमोफ्लज प्रिंट असणारं जॅकेट असा एकंदर लूक केला होता. तर, रणबीर त्याच्या नेहमीच्याच जीन्स आणि टीशर्टमधील कूल लूकमध्ये दिसला. यावेळी या दोघांनीही मास्क न विसरता लावल्याचं पाहायला मिळालं.
Oscars 2021 | अॅण्ड दी ऑस्कर गोज टू...; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
कोरोनाची लागण झाल्यानंतर रणबीरनं सर्वप्रथम यावरील उपचार घेतले, ज्यानंतर आलियालाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. आलियानंही वेळीच उपचार घेत या संसर्गावर मात केली. ज्यानंतर व्यग्र वेळापत्रतातून वेळ काढत ही जोडी थेट मालदीवला गेल्याचं दिसलं. त्यांचे मालदीवचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले नाहीत. तेव्हा आता चाहत्यांच्या नजरा आलिया भट्ट हिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लागल्या आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
येत्या काळात हे रिअल लाईफ सेलिब्रिटी कपल अयान मुखर्जी याच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटावर दोघंही बरीच मेहनत घेताना दिसले होते. त्यामुळं चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची बरीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.























